Tip: हजार रुपयाचं जेवण अन् महिला वेटरला तब्बल २ लांखांची टिप; नेमकं काय आहे प्रकरण?

Tips for Jesus News: या ग्राहकाने स्ट्रॉम्बोली फूडची ऑर्डर दिली होती. ज्याचे बिल 1038 रुपये आले होते.
Mariana Lambert, Waitress
Mariana Lambert, WaitressFacebook/@alfredoscafe.scranton
Published On

पेन्सिलवेनिया,अमेरिका : एका कॅफेमध्ये काम करणाऱ्या महिला वेटरने कधी कल्पनाही केली नसेल अशी टीप एका ग्राहकाने दिल्याने ती महिला वेटर थक्क (waitress) झाली आहे. ग्राहकाचा दिलदारपणा पाहून महिला वेटरला आश्चर्य वाटले. या महिलेला 2 लाखांहून अधिकची टीप (Tip) मिळाली आहे, तर ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ हे खूपच कमी किंमतीचे होते. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया (यूएसए) येथील अल्फ्रेडोज पिझ्झा कॅफेमध्ये ही घटना घडली आहे. ($3,000 tip given to Scranton waitress)

हे देखील पाहा -

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मारियाना लॅम्बर्ट (Mariana Lambert) नावाची महिला वेटर अमेरिकेतील (USA) स्क्रॅंटन, पेनसिल्व्हेनिया (Pennsylvania) येथील अल्फ्रेडोज पिझ्झा कॅफेमध्ये ( Alfredo’s Pizza Café in Scranton) काम करते. नेहमीप्रमाणे ती तिच्या वेळेत (शिफ्टमध्ये) काम करण्यासाठी कॅफेत आली आणि ग्राहकांना त्यांचे जेवण द्यायला लागली. तेव्हा एका ग्राहकाने ऑर्डर दिली, त्यानंतर अन्न संपवले आणि जेव्हा मारियाना हिने त्या ग्राहकाला बिल दिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. त्या ग्राहकाने जेवणाच्या बिलाची रक्कम तर दिलीच, पण सोबतच टीप म्हणून तब्बल २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम तिला दिली. सुरुवातीला तिचा आणि कॅफेमधील कर्मचाऱ्यांचा यावर विश्वास बसला नाही, पण नंतर त्यांना यावर विश्वास बसला. कारण, अमेरिकेत 'टिप ऑफ जीझस' नावाची चळवळ लोकप्रिय आहे. यानुसार त्या ग्राहकाने मारियानाला ती मोठी रक्कम टिप म्हणून दिली असावी असं म्हटलं जातंय.

या ग्राहकाने स्ट्रॉम्बोली फूडची ऑर्डर दिली होती. ज्याचे बिल 1038 रुपये आले होते. मात्र या व्यक्तीने 2 लाख 39 हजार रुपये मारियाना लॅम्बर्टला टिपमध्ये दिले. मारियाना लॅम्बर्टने सांगितले की, जेव्हा तिला हे कळले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली की, त्या ग्राहकाने तिच्या हृदयाला स्पर्श केला. तिच्यासोबत असे घडले आहे यावर तिचा अजूनही विश्वास बसत नाही. अल्फ्रेडोच्या पिझ्झा कॅफेमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही यावर विश्वास बसत नव्हता. द ख्रिश्चन पोस्ट'च्या बातमीनुसार, महिला वेटरला दिलेले हे खास सरप्राईज 'टिप ऑफ जीझस' चळवळीशीही जोडले जात आहे. ' ही मोहीम 9 वर्षांपूर्वी सुरू झाली होती.

या घटनेसारखीच एक घटना 2015 मध्येदेखील घडली होती, बारटेंडर क्लिंट स्पॉटलेसला रेस्टॉरंटमध्ये 8 लाख रुपयांपेक्षा जास्त टीप मिळाली होती, तेव्हा बिल 33 हजार रुपये आले होते. क्लिंट तेव्हा फिनिक्स, अॅरिझोना (अमेरिका) येथील क्रुडो नावाच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होते. रिपोर्टनुसार, तेव्हा एवढी मोठी टीप पेपलचे उपाध्यक्ष जॅक सेल्बी यांनी दिल्याचे सांगण्यात आले. तसे, अशी अनोखी मोहीम सप्टेंबर 2013 मध्येही सुरू झाली.

Mariana Lambert, Waitress
Nap Box : ऑफिसमध्येही डुलकी घेता येणार! 'ह्या' कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणणार पॉवर नॅप बॉक्स

दुसऱ्या एका घटनेत टिप देणार्‍या व्यक्तीने मिशिगन (यूएसए) येथील एका बारमध्ये 150 रुपयांची कॉफी प्यायली. हा व्यक्ती त्याच्या कॉलेजमधून फुटबॉल खेळल्यानंतर आला होता. त्यानंतर 2 लाख 40 हजार रुपयांची टीप देऊन हे लोक निघून गेले. सुमारे दोन महिन्यांनंतर या व्यक्तीने आणि त्याच्या मित्रांनी पुन्हा 39 लाख रुपयांची टीप दिली होती, त्यानंतर ही बातमी इंटरनेटवर व्हायरल झाली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com