Nap Box : ऑफिसमध्येही डुलकी घेता येणार! 'ह्या' कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणणार पॉवर नॅप बॉक्स

Nap Box Japan : जपानमधील कर्मचार्‍यांना जास्त वेळ काम करावे लागणे ही एक सर्वसामान्य पण, मोठी समस्या आहे.
Japanese 'nap boxes' for office workers
Japanese 'nap boxes' for office workersTwitter/@MorningWolfMatt & Pexels
Published On

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाची झोप कायम अपूर्ण राहते. माणसाला नेहमी ताजेतवाणे राहण्यासाठी पुरेशी झोप (Sleep) आवश्यक असते. त्यामुळे आपल्या व्यस्त शेड्यूलमधून १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप (Power Nap) घेण्याची आवश्यकता असते. पण ऑफिसमध्ये पॉवर नॅप घ्यायचा कसा? शांत आणि सोयीस्कर जागा असेल तर परफेक्ट पॉवर नॅप घेता येतो. जपानच्या (Japan) एका कंपनीने यावर उपाय शोधला आहे. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना पॉवर नॅप घेण्यासाठी जपानच्या एका कंपनीने व्हर्टीकल पॉवर नॅप बॉक्स तयार केला आहे. यामध्ये उभ्यानेच झोपण्याची सोय केलेली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स वाढेल असं कंपनीचं म्हणणं आहे. (Nap Box News)

हे देखील पाहा -

जपानचे इटोकी कॉर्पोरेशन (Itoki Corp) आणि कोयोजू गोहान केके (Koyoju Gohan KK) या दोन कंपन्यांनी उभ्या "नॅप बॉक्सेस" बनवण्यासाठी भागीदारी केली आहे. जेणेकरून देशात आरोग्यदायी कार्यालयीन संस्कृती आणण्यात मदत होईल. या नॅप बॉक्सची डिझाइन अजूनही प्रक्रियेत आहे, त्यामुळे याची किंमत किती आणि ते सर्वसामान्यांना कधी उपलब्ध होईल हे सांगता येणार नाही. जपानमधील कर्मचार्‍यांना जास्त वेळ काम करावे लागणे ही एक सर्वसामान्य पण, मोठी समस्या आहे. जपानमध्ये, बरेच लोक असे आहेत जे स्वत: ला काही काळ बाथरूममध्ये बंद करून घेतात आणि पॉवर नॅप घेतात.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नॅप बॉक्स हे महत्वाचं साधन आहे. हे नॅप बॉक्स वापरणारी व्यक्ती पॉडमध्ये सरळ उभे राहून झोपू शके. डोके, गुडघे आणि मागचा भाग आरामशीरपणे टेकवता येईल अशी याची डिझाइन केले आहे, जेणेकरून व्यक्ती खाली पडणार नाही. "मला वाटते की बरेच जपानी लोक ब्रेकशिवाय सतत काम करतात, आम्ही आशा करतो की कंपन्या विश्रांतीसाठी अधिक लवचिक दृष्टीकोन म्हणून याचा वापर करू शकतात" असं संशोधनकर्ते कावाशिमा म्हणाले आहेत.

Japanese 'nap boxes' for office workers
Nagarjuna's Diet Plan: वयाच्या ६२ व्या वर्षीही आहे एकदम फिट; पाहा कसा आहे नागार्जुनचा डाएट प्लान

पॉवर नॅप्सचे फायदे जाणून घ्या

१. डुलकी घेतल्याने शरीर आणि मनाला आराम मिळतो.

२.एक डुलकी घेतल्यानंतर, तुम्हाला पुढील ६ तास काम करण्याचा उत्साह राहिल.

३. पॉवर नॅप्स घेतल्याने मूड चांगला राहतो व एकाग्र राहून काम करण्यास मदत मिळते.

४. पॉवर नॅप्सचे प्रौढांसाठी अनेक प्रकारे फायदे आहेत.

५. तसेच पॉवर नॅप्समुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते व तणाव (Stress) कमी होऊन हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

६. पॉवर नॅप्स ३० मिनिटांपेक्षा जास्त नसावी. कारण अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपल्यामुळे शरीरला गाढ झोप लागते. त्यामुळे पुरेशी झोप न घेता जागे झाल्यास शरीर सुस्त वाटू लागते.

७. पॉवर नॅप घेण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.

८. पॉवर नॅप्स घेताना अलार्म लावून झोपा व झोपण्यासाठी शांत जागा निवडा.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com