Nagarjuna's Diet Plan: वयाच्या ६२ व्या वर्षीही आहे एकदम फिट; पाहा कसा आहे नागार्जुनचा डाएट प्लान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Akkineni Nagarjuna | facebook/@IamNagarjuna

नागार्जुनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये १०० च्या वर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात तेलगु, तामिळ आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. नागार्जुन आपल्या वयाच्या ६२ व्या वर्षीही एकदम फिट आहे.

Akkineni Nagarjuna Rao | facebook/@IamNagarjuna

आपल्या खानपानाबाबत तो अत्यंत स्ट्रीक्ट आहे, त्यामुळे त्याने आपल्या जेवणाचे वेळापत्रक बनवले आहे. नागार्जुन यांचे दैनंदिन फूड रुटीन कसे आहे, याबाबत थोडक्यात जाणून घ्या.

Akkineni Nagarjuna Photos | facebook/@IamNagarjuna

Breakfast - सकाळचा नाश्ता

नागार्जून सकाळच्या नाश्त्यात अंडी आणि व्हाईट ब्रेड खातो. यात कधीतरी तो हाफ फ्राय अंडी खाणं पसंत करतो.

Eggs | pexels

Second Breakfast - दुसरा नाश्ता

सकाळच्या पहिल्या नाश्त्यानंतर तो २ तासांनी दुसरा नाश्ता घेतो. यात दक्षिणेचं पारंपारिक अन्न ईडली आणि डोसा, सोबक काही फळं असा त्याचा दुसरा नाश्ता असतो.

Idali Dosa | pexels

Lunch - दुपारचं जेवण

दुपारच्या जेवणात नागार्जुन यांच्या फूट टाईमटेबलनुसार भात, चपाती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ४ भाज्यांचा समावेळ असतो.

Indian Veg Thali | pexels
Evening Snack - संध्याकाळचा अल्पोहार

संध्याकाळच्या वेळी अल्पोहारात तो विविध प्रकारची ताजी फळे खातो.

Fresh Fruits | pexels
Dinner - रात्रीचं जेवण

नागार्जुन रात्रीचं जेवण खूप लवकर म्हणजे ७ वाजताच करतो. यात ग्रील्ड चिकन, मासे आणि उकडलेले भाज्या यांचा समावेश असतो.

Grilled Chicken | pexels
बिर्याणीप्रेमी (Biryani Lover) नागार्जुन

एका मनोरंजन संकेतस्थळाच्या माहितीनुसार नागार्जुनला बिर्याणी फार आवडते. कधीतरी तो बिर्याणी खाणं पसंत करतो.

Biryani | pexels
कबाबप्रेमी (Kabab Lover) नागार्जुन

नागार्जुनने असंही सांगितलं होतं की, त्याला कबाब खाणं खूप आवडतं. विशेषतः हैदराबादच्या Tank Bund येथील कबाब त्याला जास्त आवडते.

Kabab | pexels
हैदराबादी हलीमसाठी (Haleem) ऑलवेज रेडी

एका मुलाखतीदरम्यान नागार्जुनने सांगितले होते की, हैदराबादी हलीम खाण्यासाठी मी नेहमीच भुकेलेला असतो. हैदराबादच्या हलीमवर मला गर्व आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyderabadi Haleem | pexels