भूत बंगल्यात जाताच मुलासोबत घडला भयानक प्रकार; डॉक्टरही शॉक

जेव्हा तो एका भीतीदायक घरात गेला त्या वेळेस त्याच्याबरोबर भलतेच काहीतरी प्रकार घडले
भूत बंगल्यात जाताच मुलासोबत घडला भयानक प्रकार; डॉक्टरही शॉक
भूत बंगल्यात जाताच मुलासोबत घडला भयानक प्रकार; डॉक्टरही शॉकSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : भूताचे अस्तित्व आणि त्याच्याविषयी गोष्टीची (Ghost Stories) हा केवळ आपल्या मनाचा भ्रम असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षामध्ये भूत नसतं आणि एखादं ठिकाणंही भूतांचं नसतं. १६ वर्षाच्या एक मुलगाही हेच सगळं मानत असायचा. मात्र, जेव्हा तो एका भीतीदायक घरात गेला त्या वेळेस त्याच्याबरोबर भलतेच काहीतरी प्रकार घडले आहे. सध्या मलेशियामध्ये ही घटना मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा मुलगा आपला मित्र आणि त्याच्या कुटुंबीयाबरोबर प्रसिद्ध ठिकाणी फिरण्याकरिता (Tourists) गेले होते. (This happened boy as soon as ghost went bungalow)

हे देखील पहा-

स्थानिक लोकांनी भूताची जागा म्हणून सांगितलेल्या एका इमारतीत तो आपल्या मित्राबरोबर गेला होता. मात्र, काही वेळामध्येच त्याच्याबरोबर अजब घटना घडली आणि या इमारतीत घडलेल्या भीतीदायक घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. हेही देखील रिकाम्या ऑफिसमध्ये तरुणीचा कारनामा, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना मलेशियाच्या बेनटॉन्गची आहे.

पेहांग स्टेटमध्ये आहे. इथे एक १६ वर्षाचा मुलगा आपल्या मित्राबरोबर आणि त्याच्या कुटुंबीयाबरोबर फिरण्याकरिता गेला होता. कॉस्मोच्या म्हणण्यानुसार, १ डिसेंबरला या मुलाने या भीतीदायक घरात आपल्या मित्राबरोबर प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा इमारतीच्या जवळ जाताच त्याची तब्येत खराब होऊ लागली. त्याला बरे वाटत नव्हते आणि हळूहळू तो जमिनीवर कोसळला. त्याचे तोंड आणि शरीर पिवळसर पडले होते. त्याला लगेच इमारती मधून बाहेर आणण्यात आले होते.

भूत बंगल्यात जाताच मुलासोबत घडला भयानक प्रकार; डॉक्टरही शॉक
आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक

मात्र, तो काही प्रतिसाद देत नव्हता. अखेर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते. यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. हेही चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी धडपड; बचावाचा थरारक व्हिडिओ वायरल अधिकृत वक्तव्यात या मुलाचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. क्लीवलँड क्लिनिक मेडिकल सेंटरच्या रिपोर्टनुसार, अनेकदा माणूस खूप जास्त घाबरल्यास असे होते.

मात्र, हे सामान्य बाबी आहेत. बहुतेक शास्त्रज्ञांचे असे सांगणे आहे की, केवळ भीती वाटल्याने माणसाचा मृत्यू होणे असाधारण आहे. या केसमध्ये या मुलाची इतर कोणतीही मेडिकल हिस्ट्री नव्हती. अशात त्याचा अचानक मृत्यू झाल्याने लोकांच्या मनात या जागेविषयी आणखीच प्रश्न निर्माण होत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com