आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात बडे मासेगळाला लागल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली
आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक
आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटकSaam Tv
Published On

बीड : आरोग्य विभाग (Health Department) पेपरफुटी प्रकरणात बडे मासेगळाला लागल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पुणे (Pune) पोलिसांच्या (Police) सायबर ब्रँचने लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यामधील ५ आरोपी आहेत. या प्रकरणामधील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता ११ वर पोचली आहे.

विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये डॉक्‍टर, शिक्षक, निवृत्त लष्करी जवानांचा समावेश आहे. काल ४ जणांना अटक(Arrested) करण्यात आली आहे. यात लातुर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय-५०), रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, बीड, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय- ३६), रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, बीड, उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय- ३६), रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड, शाम महादू म्हस्के (वय- ३८), रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड, राजेंद्र पांडुरंग सानप (वय-५१), रा. शामनगर, बीड अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.

हे देखील पहा-

यापुर्वी विजय मुऱ्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन सायबर ब्रँच कडून तपास सुरू आहे. काल रात्री मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(pune health department crime arrested)

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक
पर्यटकांची हुल्लडबाजी धोक्‍याची!

लातूर आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे हाच सुत्रधार असण्याची दाट शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांनीच अंबेजोगाई येथील मनोरूग्णालायातील डॉ.संदीप जोगदंड याच्याकडून १० लाख रुपये व शाम म्हस्के याच्याकडून ५ लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बडगिरे याने प्रश्‍नपत्रिका कोठून मिळविली, त्याला कोणी मदत केली व या प्रकरणामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सायबर पोलिस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com