पर्यटकांची हुल्लडबाजी धोक्‍याची!

अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर नागपूर मधील तरुणांची हुल्लडबाजी समोर आली
पर्यटकांची हुल्लडबाजी धोक्‍याची!
पर्यटकांची हुल्लडबाजी धोक्‍याची!अरुण जोशी
Published On

चिखलदरा : सेल्फी, फोटोच्या नादात अनेक तरुण- तरूणीनी आतापर्यंत आपला जीव गमावल्याच्या घटना आपण एकत असतो. परंतु, एवढ्या घटना घडून सुद्धा तरुण- तरूणी यातून काहीच धडा घेत नसल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. जिवापेक्षा फोटो, सेल्फी महत्वाचा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर नागपूर मधील तरुणांची हुल्लडबाजी समोर आली आहे.

हे देखील पहा-

चिखलदरा मधील हरिकेन पॉइंटवर जीव धोक्यात टाकून हजारो फूट खोल दरीच्या काठावरील दगडावर उभे राहून तरुणांनी जीवघेण फोटोसेशन करत आहे. त्यामुळे या हुल्लडबाजांचा जीव महत्वाचा नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (Amravati tourists Riot danger)

पर्यटकांची हुल्लडबाजी धोक्‍याची!
Malegaon: सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या 15 ते 20 नातेवाईकांचा धिंगाणा; रुग्णालयाची तोडफोड...

चिखलदऱ्यात अनेक जीवघेने पॉइंट आहे. त्यामुळे पर्यटकांनी तिथे फोटो सेशन करू नये अशा आशयाचे फलक लावून देखील पर्यटक मात्र, त्यातून काहीच बोध घेत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com