Malegaon: सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या 15 ते 20 नातेवाईकांचा धिंगाणा; रुग्णालयाची तोडफोड...

मालेगांव सामान्य रुग्णालयात कायमचं असे प्रकार होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Malegaon: सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या 15 ते 20 नातेवाईकांचा धिंगाणा; रुग्णालयाची तोडफोड...
Malegaon: सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या 15 ते 20 नातेवाईकांचा धिंगाणा; रुग्णालयाची तोडफोड...Saam Tv
Published On

नाशिक : मालेगाव (Malegaon) सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी धिंगाणा घालून, रुग्णालयाची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामान्य रुग्णालयात( hospital) आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या वृध्द महिलेचे नातेवाईक महिलेसह भेटीसाठी आले असता हा प्रकार घडला आहे. रुग्णालयातील सेक्युरीटी गार्ड यांनी आयसीयू वॉर्डात जास्त वेळ थांबू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने नातेवाईक असलेल्या एका तरुणाने गार्ड बरोबर हुज्जत घातली.

हे देखील पहा-

यामध्ये दोघांमध्ये हातापाई झाली. दरम्यान रुग्णाचे इतर 15 ते 20 महिला आणि पुरुष नातेवाईकांनी रुग्णालयात येवून धिंगाणा घालत रुग्णालयातील खुर्ची, कुंडी आदींची वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस (Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर आपल्या फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Malegaon: सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या 15 ते 20 नातेवाईकांचा धिंगाणा; रुग्णालयाची तोडफोड...
'गाय दूध देत नाही'! म्हणून शेतकऱ्याने केली पोलीस ठाण्यात तक्रार

यावेळी त्यांनी धिंगाणा करणाऱ्या दोन- तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोरोनाच्या (Corona) महामारीत याच डॉक्टरांनी देवासारखे काम केले आहे आणि अशा पध्दतीने नातेवाईक जर असा विकृतपणा करत असतील तर अशांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com