Delhi Robbery News : चोरट्यांनी दुकानाचं छत कापून 25 कोटींचे दागिने केले लंपास, दिल्लीतील खळबळजनक घटना

Delhi News : दिल्लीतील जंगपुरा भागात असलेल्या शोरूमला चोरट्यांनी टार्गेट केले.
Delhi News
Delhi News Saam Tv
Published On

Delhi Roberry :

दिल्लीत चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी जंगपुरा येथील ज्वेलरवर दरोडा टाकला आहे. दुकानाचं छत कापून चोरट्यांनी सुमारे 25 कोटी रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.

दिल्लीतील जंगपुरा भागात असलेल्या शोरूमला चोरट्यांनी टार्गेट केले. छत कापल्यानंतर चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश केला. येथून सोने, हिरे आणि दागिने चोरून चोरट्यांनी पळ काढला. पोलीस घटनेची माहिती मिळाल्यानतंर घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com