धक्कादायक! तालिबान्यांकडून महिलांच्या मृतदेहावरही लैंगिक अत्याचार

अफगाण पोलीस दलात कार्यरत असलेल्या आणि तालिबानच्या भितीने भारतात पळून आलेल्या एका महिलेने अनुभलेला भयानक प्रकार सांगितला आहे.
धक्कादायक! तालिबान्यांकडून महिलांच्या मृतदेहावरही लैंगिक अत्याचार
धक्कादायक! तालिबान्यांकडून महिलांच्या मृतदेहावरही लैंगिक अत्याचार

वृत्तसंस्था

तालिबान्यांच्या (Taliban) क्रुरतेचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या काही आठवड्यांच्या संघर्षानंतर तालिबानने अफगाणिस्तानावर (Afganistan) विजय मिळवला. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानात फक्त अराजकता (Chaos) माजली आहे. तालिबानच्या भितीने लाखो अफगाणि नागरिक देश सोडून पळून गेले आहेत. अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यापासून तालिबानने केवळ दहशतच माजवली आहे. महिलांचे स्वातंत्र्यही धोक्यात आले आहे. याहून धक्कादायक म्हणजे आता तालिबानी मृतदेहांवरही बलात्कार करु लागले आहेत. अफगाणि पोलीस दलात कार्यरत असलेल्या आणि तालिबानच्या भितीने भारतात पळून आलेल्या एका महिलेने अनुभलेला भयानक प्रकार सांगितला आहे.

हे देखील पहा-

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने आपले नाव मुस्कान असे सांगितले आहे. सध्या मुस्कान नवी दिल्लीत राहत आहेत. अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर आता तालिबानला प्रत्येक घरातील महिला हव्या आहेत. क्रुर तालिबानी आता महिलांच्या मृतदेहावरही बलात्कार करु लागले, असल्याची धक्कादायक माहिती मुस्कान यांनी सांगितली आहे. तालिबानी आता प्रत्येक घरातील महिलांचे अपहरण करुन त्यांना आपल्या वासनेचा बळी बनवत आहेत. तर काही महिलांवर आपली वासना पुर्ण केल्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारले जात आहे. एका जिहादी गटाकडून मुस्कान यांच्या जिवाला धोका होता. परिणामी त्यांना आपली नोकरी सोडावी लागली आणि देश सोडून पळून जावे लागले.

धक्कादायक! तालिबान्यांकडून महिलांच्या मृतदेहावरही लैंगिक अत्याचार
तालिबानवर विश्वास आहे का? याबाबत जो बायडेन पत्रकाराला म्हणाले, I Love You but...

मुस्कान यांनी सांगितले की, जेव्हा त्या अफगाणिस्तानमध्ये होत्या तेव्हा त्या कामावर गेल्या की, त्यांना धमकी दिली जात असे, त्यांच्या कुटुंबालाही धोका होता, ज्यामुळे त्यांनी आपली नोकरी सोडून देशातून पळ काढावा लागला. मुस्कान सांगतात, तालिबान्यांनी मृतदेहांवर बलात्कारही केला आणि ती व्यक्ती मृत आहे की जिवंत आहे याची त्यांना कोणतीही पर्वा नव्हती. जर एखादी महिला सरकारसाठी काम करत असेल, तर तिला तालिबानच्या रोषाला सामोरे जावे लागते. तालिबानने कालच एका महिलेचे अपहरण केले आणि तिला आपल्या वासनेचा बळी बनवले. आता तालिबान्यांनी अफगाणिस्तान सरकारला ताब्यात घेतल्याबरोबर इस्लामिक तेहजीबला मान्यता दिली आहे. आता मुले आणि मुली एकाच शाळेत एकत्र शिक्षण घेऊ शकणार नाहीत.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com