तालिबानवर विश्वास आहे का? याबाबत जो बायडेन पत्रकाराला म्हणाले, I Love You but...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील स्वतः अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत ते वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन जनतेला संबोधित देखील करत आहे.
तालिबानवर विश्वास आहे का? याबाबत जो बायडेन पत्रकाराला म्हणाले, I Love You but...
तालिबानवर विश्वास आहे का? याबाबत जो बायडेन पत्रकाराला म्हणाले, I Love You but...Saam Tv News
Published On

वॉशिंग्टन : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afganistan) ताबा मिळवल्यानंतर जगभराचे तालिबानच्या पुढील भुमिकेकडे लक्ष लागलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) हे देखील स्वतः अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत ते वेळोवेळी पत्रकार परिषद (Pres Confrance) घेऊन जनतेला संबोधित देखील करत आहे. कालसुद्धा त्यांनी व्हाईट हाऊसमधून जनतेला संबोधित केलं. या पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकाराने तालिबानबद्दल एक प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नाला मिश्किल उत्तर दिलं आहे. (I don't trust anybody, including you, I love you but there is not a lot of people I trust said joe biden)

हे देखील पहा -

रविवारी व्हाईट हाऊसमधील (White House) एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने बायडेन यांना विचारलं की, तुम्हाला तालिबानवर विश्वास आहे का? त्यावर उत्तर देताना बायडेन म्हणाले की, नाही. मला तुमच्यावर सुद्धा विश्वास नाही. तुमच्यावर माझं प्रेम आहे पण, मी सहसा लोकांवर विश्वास ठेवत नाही. तालिबानला आता काहीतरी ठोस निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक बाबी आणि व्यापाराबद्दल त्यांना मदत घ्यावी लागेल. त्यांनी अद्यापतरी अमेरिकन सैन्यावर हल्ला केलेला नाही. मात्र त्यांनी दिलेला शब्द ते पाळतात का, हे पहावं लागेल.

तालिबानवर विश्वास आहे का? याबाबत जो बायडेन पत्रकाराला म्हणाले, I Love You but...
Afghanistan : तालिबान्यांना मोठा दणका! पंजशीर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांन; ३०० दहशतवादी ठार

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे पाच हजार सैनिक दाखल झाले असून सध्या काबुल येथील हमीद करजाई विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे. या विमानळावरुन अमेरिकन नागरिकांसह मित्रराष्ट्रांच्या नागरिकांना रेस्क्यु करण्यात येत आहे. सुमारे ३३ हजार लोकांना अफगाणिस्तानातून सुरक्षित बाहेक काढण्याचे अमेरिकेचे लक्ष्य आहे. भारतालाही आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका मदत करत आहे. त्यानुसार दररोज दोन विमानांना उड्डाणाची परवानगी अमेरिकेने दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com