Afghanistan : तालिबान्यांना मोठा दणका! पंजशीर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांन; ३०० दहशतवादी ठार

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवून, आठवडा उलटला आहे. मागील आठवड्याभरापासून अफगाणिस्तानात परिस्थिती संपूर्ण जग बघत आहे.
Afghanistan : तालिबान्यांना मोठा दणका! पंजशीर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांन; ३०० दहशतवादी ठार
Afghanistan : तालिबान्यांना मोठा दणका! पंजशीर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांन; ३०० दहशतवादी ठारSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : तालिबाननं Taliban अफगाणिस्तानवर Afghanistan कब्जा मिळवून, आठवडा Week उलटला आहे. मागील आठवड्याभरापासून अफगाणिस्तानात परिस्थिती संपूर्ण जग बघत आहे. लाखो लोक असहाय झाले आहेत. अनेकांना देश सोडायचा आहे. विमानतळावर देखील चेंगरा- चेंगरी सुरू झाली आहे. काही जणांना त्या चेंगरा- चेंगरीत, गोळीबारमध्ये Firing जीव गमवावा लागला आहे.

मात्र, अफगाणिस्तानातला एक प्रांत आजून देखील स्वतंत्र आहे. २० वर्षां अगोदर अफगाणिस्तानात तालिबानची राजवट होती. मात्र, तेव्हा पंजशीर प्रांतावर तालिबानला कब्जा करता आलेला नव्हता. आता परत एकदा पंजशीरनं त्याच इतिहासाची पुनरावृत्ती घडवून आणली आहे. काबुल ताब्यात घेताच तालिबाननं बंडखोरांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या, पंजशीर खोऱ्याकडे लक्ष वळवले आहे.

हे देखील पहा-

मात्र, अमेरिकन American बनावटीच्या शस्त्रांनी सज्ज असलेल्या, तालिबान्यांना पंजशीर Panjshir मधील बंडखोरांनी जोरदार दणका दिला आहे. तालिबान्यांचे ३०० दहशतवादी मारले गेले आहेत. तालिबाननं कारी फसीहुद दीन हाफिजुल्लाहच्या याच्या नेतृत्त्वाखाली पंजशीरवर हल्ला करण्याकरिता शेकडो दहशतवादी पाठवण्यात आले होते. मात्र, बगलान प्रांतातल्या अंदराब Andrab खोऱ्यामध्ये लपून बसलेल्या, पंजशीरच्या बंडखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला आहे. यामध्ये ३०० तालिबानी मारले गेले आहेत.

Afghanistan : तालिबान्यांना मोठा दणका! पंजशीर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांन; ३०० दहशतवादी ठार
अफगाणिस्तानच्या डोक्यावर नवीन संकट, IS कडून हल्ला होण्याची शक्यता; अमेरिकेनं दिला इशारा

यामुळे तालिबान्यांना मिळणारा रसद पुरवठा बंद करण्यात आला आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून पंजशीर खोऱ्यामध्ये बंडखोर एकत्र येऊ लागले आहेत. यामधील बहुतेक जण अफगाण राष्ट्रीय लष्कराचे सैनिक असणार आहेत. त्यांचे नेतृत्त्व नॉर्दन अलायन्सचे प्रमुख राहिलेले माजी मुजाहिद्दीन कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करत आहेत. त्यांच्या बरोबर माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह आणि बल्ख प्रांताचे माजी गव्हर्नर यांची तुकडीदेखील आहे. पंजशीरमध्ये ९ हजार बंडखोर सैनिक आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com