श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; एक पोलीस कर्मचारी शहीद, गोळीबारात ७ वर्षांची मुलगी जखमी

Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे.
Terrorist attack
Terrorist attackSaam Tv
Published On

श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये ( Srinagar ) मंगळवारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवादी हल्ल्यात जम्मू आणि काश्मीरचा एक पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या मुलीवर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात पोलीस (Police ) कर्मचारी शहीद झाले असून मुलगी जखमी झाली आहे. श्रीनगर जिल्ह्यामधील सौरा या भागात हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ( Omar Abdullah ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Jammu and kashmir News In Marathi )

हे देखील पाहा -

काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यात दहशतवादी झाला आहे. या हल्ल्यात सैफुल्ला कादरी नामक पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. त्यांची मुलगी गोळीबारात जखमी झाली आहे. हे पोलीस कर्मचारी श्रीनगरच्या मलिक साब भागात राहत होते. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. उमर अब्दुल्ला म्हणाले,'मी जम्मू-काश्मीरच्या पोलीस कर्मचारी सैफुल्ला कादरी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवतो. या दहशतवाद्यांनी फक्त पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली नसून त्यांच्या ७ वर्षीय मुलीला जखमी केले आहे. माझ्या माहितीनुसार आता त्यांच्या मुलीची प्रकृती ठीक आहे'.

Terrorist attack
ज्ञानवापी प्रकरणावर पुढील सुनावणी २६ मे रोजी पार पडणार

दरम्यान, दहशतवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २२ मे रोजी अमरनाथ यात्रेला धमकी दिली. याच 'द रेजिस्टेंस फ्रंट' या दहशतवादी संघटनेने राष्ट्रीय स्वंयसेवक संघावरही निशाणा साधला होता. त्यात, आता अमरनाथ यात्रा ३० जून पासून सुरू होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी ही अमरनाथ यात्रा संपणार आहे. ४३ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेत यंदा गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी यात्रेसाठी चोख बंदोबस्ताची तयारी केली आहे. दरम्यान, काश्मीरच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ दलानंही चांगलं नियोजन केलं आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com