ज्ञानवापी प्रकरणावर पुढील सुनावणी २६ मे रोजी पार पडणार

देशभरात वारणसीच्या ज्ञानवापी प्रकरणाचा मुद्दा गाजत आहे. आज या ज्ञानवापी प्रकरणावर सुनावणी पार पडली.
Gyanvapi Masjid Case, Gyanvapi Mosque Row, Gyanvapi Masjid controversy
Gyanvapi Masjid Case, Gyanvapi Mosque Row, Gyanvapi Masjid controversySaam Tv
Published On

वाराणसी : देशभरात वारणसीच्या( Varanasi ) ज्ञानवापी प्रकरणाचा मुद्दा गाजत आहे. आज या ज्ञानवापी प्रकरणावर सुनावणी पार पडली. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं सुनावणी ही पुढे ढकलली आहे. तर या ज्ञानवापी प्रकरणाची (Gyanvapi Case ) पुढील सुनावणी २६ मे रोजी पार पडणार आहे. या पुढील सुनावणीत या ज्ञानवापी मशिदीच्या ( Masjid ) सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. ( Gyanvapi Masjid Case News In Marathi )

हे देखील पाहा -

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे प्रवर्ग करण्यात आली होती. त्यानंतर आज हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी या ज्ञानवापी प्रकरणावर माहिती दिली. त्यावेळी त्यांनी ज्ञानवापी प्रकरणावर कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीत ज्ञानवापी प्रकरणात ७-११ सीपीसी अंतर्गत आक्षेप नोंदवल्यानं मुस्लिम पक्षकाराच्या याचिकेवर २६ मे रोजी सुनावणी होईल असे सांगितले. दरम्यान, सर्वेक्षण अहवालावर आक्षेप मागवायचे की मशीद समितीच्या आदेश नियम ७-११ अर्जावर आधी सुनावणी घ्यायची याबाबत न्यायालय आज आदेश देणार होते. त्यानंतर आज न्यायालयानं दोन्ही पक्षकारांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवण्यासाठी सांगत एका आठवड्याचा आत अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत.

Gyanvapi Masjid Case, Gyanvapi Mosque Row, Gyanvapi Masjid controversy
जग मंदीच्या लाटेवर, पण भारत सर्वात 'बेस्ट'; IMF म्हणतेय, टेन्शन घेऊ नका!

दरम्यान,सुनावणीदरम्यान खटला प्रार्थनास्थळ कायद्यांतर्गत प्रतिबंधित असल्याचा युक्तिवाद मशीद समितीने केला आहे. तर हिंदू पक्षकारानं सर्वेक्षण अहवालाचा विचार केला पाहिजे असे म्हटले. आज न्यायालयानं दोन्ही पक्षकारांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. या आठवड्याचा आत अहवाल सादर करण्यास सागंतिले आहे. दरम्यान, न्यायमूर्तींनी अ‍ॅडव्होकेट कमिशनरच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालावर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पक्षकारांकडून आक्षेप मागवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com