Telegram Founder Arrested: एअरपोर्टवर उतरताच टेलिग्रामचा संस्थापक पावेल ड्यूरोवला अटक, नेमकं कारण काय?

Telegram Founder Paul Durov: फ्रेंच कस्टम अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी फ्रेंच-रशियन अब्जाधीश पावेल ड्युरोव अझरबैजानहून आपल्या प्रायव्हेट जेटने बोर्गेट विमानतळावर आल्यानंतर अटक केली.
Telegram Founder Arrested: एअरपोर्टवर उतरताच टेलिग्रामचा संस्थापक पावेल ड्यूरोवला अटक, नेमकं कारण काय?
Telegram Founder ArrestedSaam Tv
Published On

टेलीग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक पावेल ड्युरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली. पॅरिस एअरपोर्टवर उतरताच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. फ्रेंच कस्टम अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी फ्रेंच-रशियन अब्जाधीश पावेल ड्युरोव अझरबैजानहून आपल्या प्रायव्हेट जेटने बोर्गेट विमानतळावर आल्यानंतर अटक केली.

टेलिग्रामवर नियंत्रण नसल्याबद्दल ३९ वर्षीय पावेल ड्युरोवविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. ज्यामध्ये टेलिग्राम प्लॅटफॉर्मचा वापर मनी लाँड्रिंग, ड्रग्ज तस्करी आणि पेडोफिलिक कंटेन्ट शेअर करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. BFMTV च्या मते, अटक वॉरंट जारी झाल्यापासून टेलिग्रामचे संस्थापक नियमितपणे फ्रान्स आणि युरोपमध्ये जात नव्हते.

Telegram Founder Arrested: एअरपोर्टवर उतरताच टेलिग्रामचा संस्थापक पावेल ड्यूरोवला अटक, नेमकं कारण काय?
Assam Case : अत्याचारातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटला, तलावात उडी मारल्याने जीव गमावून बसला

फ्रान्समधील अल्पवयीन मुलांविरुद्ध हिंसाचार रोखण्यासाठी काम करणारी एजन्सी OFMIN ने फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबरबुलिंग, संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या कथित गुन्ह्यांमध्ये पावेल ड्युरोव यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पावेल ड्युरोव यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मचा गुन्हेगारी वापर रोखण्यासाठी कारवाई करण्यात अयशस्वी झाल्याचा संशय आहे.

Telegram Founder Arrested: एअरपोर्टवर उतरताच टेलिग्रामचा संस्थापक पावेल ड्यूरोवला अटक, नेमकं कारण काय?
Unified Pension Scheme : काय आहे यूनिफाइड पेन्शन स्कीम; योजनेचा लाभ केव्हापासून घेता येणार?

पीडोफिलिक कंटेन्टमध्ये लैंगिक उत्तेजित करणाऱ्या कल्पनांचा समावेश असतो. ज्यामध्ये १३ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश असतो. पेडोफाइल तरुण मुले, मुली किंवा दोघांकडे आणि प्रौढांकडे आकर्षित होऊ शकतात. टेलिग्रामचे संस्थापक पावेल ड्युरोव हे रशिया वंशाचे आहेत. टेलिग्रामचे ९०० दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत. सध्या पावेल ड्युरोव दुबईमध्ये राहतात. ऑगस्ट २०२१ मध्ये ते फ्रेंच नागरिक बनले.

Telegram Founder Arrested: एअरपोर्टवर उतरताच टेलिग्रामचा संस्थापक पावेल ड्यूरोवला अटक, नेमकं कारण काय?
NRI Assassination: NRI वर जीवघेणा हल्ला; मुलांच्या देखत NRI वर हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या, Video व्हायरल

पावेल ड्युरोव हे VKontakte सोशल नेटवर्कचे संस्थापक देखील आहे. पावेल ड्युरोव यांनी २०१४ मध्ये रशिया सोडले कारण त्यांनी Kontakte युजर्सचा डेटा रशियन सुरक्षा सेवांसोबत शेअर करण्यास नकार दिला. त्यानंतर, रशियाने युजर्सला सुरक्षा सेवांसाठी ऑनलाइन संप्रेषण प्रदान करण्यास नकार दिल्याबद्दल टेलिग्राम ब्लॉक करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. टेलिग्रामचा वापर रशियन भाषिकांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. युक्रेनमधील युद्धाची माहिती शेअर करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. रशियन सैन्यांकडून याचा जास्त वापर केला जातो.

Telegram Founder Arrested: एअरपोर्टवर उतरताच टेलिग्रामचा संस्थापक पावेल ड्यूरोवला अटक, नेमकं कारण काय?
Drugs Ban: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; तब्बल १५० औषधांवर घातली बंदी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com