Drugs Ban: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; तब्बल १५० औषधांवर घातली बंदी

Drugs Ban: सरकारने तब्बल १५० औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही औषधे योग्य नसून त्यांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
Drugs Ban
Drugs BanGOOGLE
Published On

औषधांच्या बाबतीत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने तब्बल १५० औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ताप आणि दुखण्यासंदर्भातील काही औषधं तुम्हाला मेडिकलच्या दुकानात मिळू शकणार नाहीत. ही औषधे योग्य नसून त्यांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

कोणत्या औषधांवर घालण्यात आलीये बंदी?

सरकारने ज्या औषधांवर बंदी घातली आहे, त्यात ताप आणि दुखण्यावर उपचार करण्यासाठी अनेक औषधं वापरली जातात. यामध्ये औषधांमध्ये Aceclofenac 50mg + Paracetamol 125mg कॉम्बिनेशन असलेल्या गोळ्यांच्या नावांचा समावेश आहे. त्याशिवाय, मेफेनामिक एसिड + पॅरासिटामोल इंजेक्शन, सेट्रीजीन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलफ्रीन एचसीएल, लेवोसेट्रीजीन + फेनिलफ्रीन एचसीएल + पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाइन आणि कॅमिलोफिन डाइहाइड्रोक्लोराइड 25एमजी + पॅरासिटामोल 300एमजी यांचा समावेश आहे.

'या' औषधांची बंद होणार विक्री

आरोग्य मंत्रालयाने काही औषधांवर बंदी घालण्याबाबत अधिसूचना जारी केलीये.यानुसार, सौंदर्य प्रसाधनं कायदा 1940 च्या कलम 26A अंतर्गत संबंधित औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी तात्काळ लागू करण्यात आली असून नमूद केलेल्या 150 हून अधिक औषधांची निर्मिती देखील थांबवली जाईल.

कशाच्या आधारावर औषधांवर बंदी घालण्यात आली?

आरोग्य मंत्रालय वेळोवेळी औषधांवर बंदी घालत असून जी औषधं योग्य चाचणी न घेता बाजारात आणण्यात आलीयेत किंवा ज्यांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्याला धोका आहे, अशा औषधांवर बंदी घालण्यात येते. यासाठी तज्ज्ञांची समिती आणि ड्रग्स टेक्निकल एडवाइजरी बोर्डाकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com