(प्रमोद जगताप)
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रेवंथ रेड्डी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. प्रचारादरम्यान जनतेला दिलेले आश्वसन पूर्ण करण्यास त्यांनी सुरुवात केलीय. प्रचारादरम्यान काँग्रेसकडून जाहीर केलेल्या ६ गॅरंटी योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही केली आहे. तसेच दिव्यांग महिलांना नोकरी देण्याच्या आश्वासनाच्या फाईलवरही सही केलीय. (Latest News)
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने ६ गॅरंटी दिली होती. काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल तेव्हा पहिली सही ही ६ गॅरंटी योजनेवर केली जाईल, असं आश्वासन काँग्रेसकडून दिलं होत. ते आश्वसन त्यांनी सरकार येताच पूर्ण केले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काय आहे ६ गॅरंटी योजना
महालक्ष्मी योजना- महिलांना दरमहा २५०० आणि ५०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार. तसेच राज्य परिवहन TSRTC बसमध्ये मोफत प्रवास.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये आणि शेतमजुरांना १२ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार.
ज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज दिली जाणार.
इंदिरम्मा इंदलू योजना- ज्या कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही त्यांना घरासाठी जमीन आणि ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार.
युवा विकास योजना - विद्यार्थ्यांना ५ लाख रुपयांची मदत केली जाणार. या रकमेचा उपयोग विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची फी भरण्यासाठी होईल.
चेयुथा योजना- वृद्ध आणि दुर्बलांना ४,००० रुपये पेन्शन दिली जाणार.
आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासह १ उपमुख्यमंत्री आणि ८ मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणाऱ्या रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना त्यांचे समर्थक 'टायगर रेवंथ' म्हणून ओळखतात. रेवंथ रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री ठरलेत. रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने विजय मिळवत बीआरएसला सत्तेबाहेर केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.