Narendra Modi News: एनडीएमध्ये ओबीसींचं किती टक्के नेतृत्व? काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना PM मोदींनी यादीच दिली

Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
Narendra Modi News:
Narendra Modi News:ANI
Published On

Narendra Modi News:

तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील हैदराबादच्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

'तेलंगणात पहिल्यांदा भाजपचा ओबीसी समुहातील मुख्यमंत्री होईल, असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच मोदी यांनी सत्तेमधील ओबीसी मंत्र्यांची आकडेवारी देखील सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'काँग्रेस आणि बीआरएस कधीच ओबीसी समुहातील व्यक्तीला मुख्यमंत्री करणार नाही. काँग्रेस आणि बीआरएस हे एकमेकांना मिळालेले आहेत. या दोघांच्या डीएनएमध्ये भ्रष्टाचार, कारस्थानी आणि घराणेशाही या तीन गोष्टी सारख्या आहेत'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओबीसीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'एनडीए आणि भाजप पक्ष ओबीसींच्या हिताकडे सर्वात जास्त लक्ष देतं. त्यांना सर्वाधिक प्रतिनिधित्व दिलं आहे. केंद्र सरकारमध्ये २७ ओबीसी मंत्री आहे. सरकारमध्ये ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. आज देशात भाजपचे ८५ ओबीसी खासदार आहेत. तर आज देशात ३६५ ओबीसी आमदार आहेत'.

'कुंभार, सोनार, सुतार, मुर्तीकार, धोबी, शिंपी, नाव्ही असे सर्व समाज बांधव मागासवर्गीय समाजातून येतात. या बांधवांसाठी भाजप सरकारने पीएम विश्वकर्मा योजना तयार केली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.

Narendra Modi News:
Raju Shetti: राज्य सरकार साखर कारखानदारांच्या ताटाखालचे मांजर; राजू शेट्टी यांचा घणाघात

काँग्रेसने काय आरोप केला होता?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेवर भाष्य करताना भाजप सरकारने ओबीसी वर्गासाठी काहीच काम केलं नाही. आमचे चार पैकी तीन मुख्यमंत्री हे ओबीसी वर्गातून येतात, असं सांगितलं.

Narendra Modi News:
Delhi Pollution: दिल्लीकरांच्या आरोग्याशी खेळू नका, सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com