Delhi Pollution: दिल्लीकरांच्या आरोग्याशी खेळू नका, सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारलं

Delhi Pollution: पंजाबमध्ये शेतांमध्ये आग लावण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. केवळ दोषारोप करायला हा राजकीय विषय नाही, असे खडेबोल पंजाब सरकारला न्यायालयाने प्रदूषणाच्या याचिकेवरून सुनावले आहेत
Air Pollution
Air Pollution Saam Digital
Published On

Delhi Pollution

दिल्ली एनसीआरमध्ये सतत वाढत असलेल्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. पंजाबमध्ये शेतांमध्ये आग लावण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. केवळ दोषारोप करायला हा राजकीय विषय नाही, असे खडेबोल पंजाब सरकारला न्यायालयाने प्रदूषणाच्या याचिकेवरून सुनावले आहेत.

सर्व राज्य सरकारना याआधीच प्रदूषण रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणतेही राज्य त्यांच्याकडे आदेश नाही असे म्हणू शकत नाही. ज्याकाही उपाययोजना केल्या आहेत त्या सर्व कागदावरच आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी आणि पालन करणे महत्त्वाचे महत्त्वाचे आहे, असे न्यायमूर्ती संजय किसन कौल यांनी म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतांमध्ये पालापाचोळा जाळल्यामुळेच दिल्लीचे प्रदूषण वाढत आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र, दिल्लीचे प्रदूषण वाढवणारा तो एक महत्त्वाचा घटक आहे. दिल्लीत सातत्याने वाढणाऱ्या प्रदूषणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दिल्लीतील नागरिकांना असे अडचणीस टाकता येणार नाही.

Air Pollution
Bihar Reservation: आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवणार, नितीश कुमार यांची घोषणा

पंजाबच्या वकिलांनी सरकारची बाजू माडताना शेतात पालापाचोळा जाळण्याची समस्या काही दिवसांपुरतीच असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. हा एक छोटासा मुद्दा असेल पण त्याचं गांभीर्य खूप मोठं आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करा पण हा प्रकार थांबला पाहिजे. कधी भरपाईसारखे उपाय करून तर कधी कारवाई करून, असं न्या. कौल यांनी नमूद केलं.

Air Pollution
Prahlad Patel Car Accident : केंद्रीय मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू; VIDEO आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com