Lok Sabha Elections 2024: भाजपनं स्वीकारलं राहुल गांधींचं चर्चेचं चॅलेंज; भाजपकडून कोण करणार वादविवाद?

Tejashwi Surya Accepted Rahul Gandhi Challenge: तेजस्वी सूर्या यांनी पत्र लिहून राहुल गांधी यांचे चर्चेचं आव्हान स्वीकारलंय.चर्चेसाठी भाजपकडून एक नेता आपल्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याच म्हटलंय.
Lok Sabha Elections 2024: भाजपनं स्वीकारलं राहुल गांधींचं चर्चेचं चॅलेंज; भाजपकडून कोण करणार वादविवाद?
Tejashwi Surya Accepted Rahul Gandhi ChallengeSaam Tv

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या दोन माजी न्यायाधीशांनी आणि एक संपादकाने राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना चर्चेसाठी एकाच व्यासपीठावर बोलवलं होतं. दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आव्हान स्वीकारलं आहे. तेजस्वी सूर्या यांनी पत्र लिहून आव्हान स्वीकारल्याचं सांगितलं असून भाजपकडून एक नेता आपल्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याच म्हटलंय.

तेजस्वी सूर्या यांनी पत्रात म्हटलं की, प्रिय राहुल गांधी भारतीय जनता युवा मोर्चा तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. आमचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांना तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. उपाध्यक्ष अभिनव प्रकाश हे पासी (एससी) समुदायाचे तरुण आणि शिक्षित नेते आहेत, ज्यांचा समुदाय रायबरेलीमध्ये सुमारे ३० टक्के आहे. हा राजकीय वंशज आणि सामान्य तरुण यांच्यातील समृद्ध वादविवाद असेल.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसोबतच्या चर्चेचे निमंत्रण स्वीकारण्याचे अजून "धैर्य" दाखवलेले नाही. निवृत्त न्यायाधीश मदन बी. लोकूर , न्यायाधीश अजीत पी. शाह आणि एन. राम यांनी मागील आठवड्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लोकसभेच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. दोन्ही नेत्यांनी चर्चेसाठी एकाच व्यासपीठावर यावे, असं निमंत्रण दिलं होतं.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स पोस्ट लिहिताना म्हटलं होतं की, राहुल गांधींना चर्चे आमंत्रण स्वीकारलंय परंतु राहुल गांधींनी चर्चेचं पत्र पंतप्रधान मोदींना दिलंय. पण अजून ५६ इंच छात्री असलेल्या पंतप्रधान मोदींनी अजून निमंत्रण स्वीकारलं नाहीये. तर पंतप्रधान मोदी देत असलेल्या मुलाखती आधीच नियोजित केलेल्या असतात. त्यांना काय सांगायचं आहे काय प्रश्न करायची आहेत ते ठरवलेलं असतं, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता.

Lok Sabha Elections 2024: भाजपनं स्वीकारलं राहुल गांधींचं चर्चेचं चॅलेंज; भाजपकडून कोण करणार वादविवाद?
Rahul Gandhi: लग्न कधी करणार? कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना विचारला प्रश्न; सांगितली 'मन की बात'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com