Tata vs Reliance: टाटांच्या 'या' कंपनीने रिलायन्सच्या शेअर्सबरोबर साधली बरोबरी

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर BSE ट्रेडिंग दरम्यान 4 टक्क्यांनी वाढून 3,479.35 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले.
Tata vs Reliance: टाटांच्या 'या' कंपनीने रिलायन्सच्या शेअर्सबरोबर साधली बरोबरी
Tata vs Reliance: टाटांच्या 'या' कंपनीने रिलायन्सच्या शेअर्सबरोबर साधली बरोबरीSaam Tv
Published On

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) चे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर BSE ट्रेडिंग दरम्यान ४ टक्क्यांनी वाढून 3,479.35 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. टाटा समूहाच्या कंपनीच्या शेअरची मागील विक्रमी उंची ३३९९ रुपये होती, जी यावर्षी २५ जूनला पोहोचली. शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे टीसीएसचे मार्केट कॅप १३ लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले.

हे देखील पहा-

आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या बिझनेसला हा धक्काच आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे Reliance सध्याचे बाजारमुल्य १३.५३ लाख कोटी रुपये आहे. सध्या देशातील सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी रिलायन्स आहे. टीसीएसचे बाजारमुल्य आज १२.८७ लाख कोटींवर पोहोचल आहे. टीसीएस कडून शुक्रवारी सांगण्यात आले की, सलग दुसऱ्या वर्षी कंपनीला Microsoft Business Applications 2021/2022 Inner Circle साठी निवड करण्यात आली आहे.

Tata vs Reliance: टाटांच्या 'या' कंपनीने रिलायन्सच्या शेअर्सबरोबर साधली बरोबरी
Crime: चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीनेच केली पतीची हत्या!

एचडीएफसीने म्हटले की, एचडीएफसी सिक्योरिटीजने टीसीएसच्या शेअरसाठी ३६५४ रुपयांचे टार्गेट प्राईस ठेवत अॅड रेटिंग तसेच ठेवले आहे. येत्या काळात कंपनी Company चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, टीसीएस ब्रँड, दीर्घकालीन गुंतवणूक संस्कृती आणि कमी एक्झिट रेटमुळे येत्या तिमाहीत कंपनीची कामगिरी सुधारण्याची अपेक्षा आहे. TCS चे शेअर्स शुक्रवारी ३.१५ टक्क्यांनी वाढून ३४५९.५० रुपयांवर बंद झाले.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com