Tamil Nadu Factory Blast: किंचाळ्या, स्फोटांचे आवाज....तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ५ महिलांसह ८ जणांचा मृत्यू

Tamil Nadu Firecracker Factory Blast News: तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. त्यात पाच महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Tamil Nadu Factory Blast: किंचाळ्या, स्फोटांचे आवाज....तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ५ महिलांसह ८ जणांचा मृत्यू
8 People Died In Blast Occurred In Tamil Nadu's Firecracker FactorySAAM TV

तामिळनाडूमध्ये गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. विरूधुनगर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. त्यात पाच महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहेत. त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केलं आहे. कारखान्याला लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Tamil Nadu Factory Blast: किंचाळ्या, स्फोटांचे आवाज....तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ५ महिलांसह ८ जणांचा मृत्यू
Brazil Flood: ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार... ५७ हून अधिक मृत्यू; हजारो नागरिक बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, विरूधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीत फटाक्यांचा कारखाना आहे. या ठिकाणी फटाके तयार करण्याचे काम सुरू होते. अनेक मजूर काम करत होते. त्याचवेळी कारखान्यात ठेवलेल्या फटाक्यांचे स्फोट होण्यास सुरुवात झाली. स्फोटानंतर कारखान्यातून किंचाळ्या ऐकू येत होत्या. तर एकापाठोपाठ एक स्फोट होत होते. त्यांचा आवाज कानठळ्या बसवणारा होता.

कारखान्याच्या बाहेर आणि परिसरात असलेल्या नागरिकांनी तिथं धाव घेतली. त्यानंतर काही जणांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

८ जणांनी गमावला जीव

कारखान्यात फटाक्यांच्या स्फोटानंतर आग (Fire) लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. तर दुसरीकडे बचाव आणि मदतकार्य सुरू होते. वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत आठ जणांचे मृतदेह आढळून आले होते. त्यात पाच महिलांचा समावेश होता. तर काही जण गंभीररित्या होरपळले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

Tamil Nadu Factory Blast: किंचाळ्या, स्फोटांचे आवाज....तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ५ महिलांसह ८ जणांचा मृत्यू
Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com