

भारत-वेस्ट इंडिज सुपर ८ सामना सेमी फायनलसाठी निर्णायक.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक गुण.
नेट रन रेटच्या आधारे सेमी फायनलचा निर्णय होणार.
टी-२० वर्ल्ड कप सुपर ८ फेरीमधील शेवटचा सामना भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट सेमी फायनलमध्ये जाणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. दरम्यान या सामन्यात भारताच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. कारण वेस्टइंडिजची फलंदाजी दहाव्या विकेटपर्यंत तगडी आहे. त्यामुळे गोलंदाजांसमोर मोठं आव्हान असणार आहे. मात्र आयसीसीचा एक असा नियम आहे, ज्यामुळे एकही चेंडू न खेळता भारत सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर पडू शकतो. नेमका काय आहे तो नियम ते जाणून घेऊ.
भारत आणि वेस्ट इंडिजच्या सामन्यात जर पाऊस झाला तर भारताला याचा मोठा फटका बसू शकतो. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना आयसीसीच्या नियमानुसार एक एक गुण देण्यात येईल. त्यामुळे भारतीय संघाचा रन रेट हा कमी होईल. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा रन रेट भारतापेक्षा जास्त असल्याने वेस्ट इंडिजला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळेल. जर पावसाने खोडा घातला तर सामना पूर्णपणे कॅरेबियन संघाच्या बाजूने पलटू शकतो.
भारत आणि वेस्ट इंडिजच्या सामनावेळी कोलकातामध्ये हवामानाच्या अंदाजानुसार प्रामुख्याने स्वच्छ हवामान राहणार आहे. पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. लढतीच्या वेळी २९ अंश तापमान आणि ६० टक्के आर्द्रता राहणार आहे.
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी तिलक वर्माच्या फलंदाजी क्रमाची महत्त्वाची माहिती दिली. झिम्बाब्वेविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात वर्माला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात तिलकने फक्त १६ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी ८४ धावांची जबरदस्त भागीदारी केली होती.
तिलक वर्मा विडिंजविरोधात पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल, हे अद्याप निश्चित नाहीये. आमच्याकडे आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तिलक वर्माला संजू सॅमसनसह टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना पाहिलंय. विरोधी संघाच्या प्लानिंगनुसार आम्ही फलंदाजीत बदल करू शकतो, असं रायन टेन डोइशेट म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.