नव्या वर्षाच्या उत्सवात आगीचा भडका, बारमध्ये होरपळून १० जणांचा मृत्यू, स्वित्झर्लंडमध्ये भयंकर घटना

Switzerland New Year bar explosion fire :स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान बारमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत.
Switzerland New Year bar explosion fire
Switzerland New Year bar explosion fireSaam TV Marathi
Published On

Switzerland New Year bar fire : २०२५ चा निरोप देण्यासाठी आणि २०२६ या नव्या वर्षाचं उत्सवात स्वागत करण्यासाठी बार-पब अन् हॉटेलमध्ये अनेकजण जातात. पण स्वित्झर्लंडमध्ये नवं वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान १० जणांचा मृत्यू झालाय. नवीन वर्षाच्या सेलीब्रिशेनवेळी स्वित्झर्लंडमध्ये बारमध्ये अचानक स्फोट झाला अन् आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा झाल्याचे वृत्त SkyNews ने दिले आहे. अनेकजण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचा भडका का उडाला, याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. या आगीचे व्हिडिओ, फोटो सोशल मिडिया व्हायरल झाले आहेत.

स्वित्झर्लंडमधील स्की रिसॉर्ट शहरातील ले कॉन्स्टेलेशन बारमध्ये पार्टी सुरू असताना अचानक स्फोट झाला. त्यानंतर आग भडकली अन् जिकडे तिकडे धूर अन् आगीच्या ज्वाळा उडू लागल्या. आरडाओरड अन् किंचाळ्याने परिसर हादला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचावपथकाने धाव घेतली. सध्या बचाव पथकाचे काम वेगात सुरू आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे १:३० च्या सुमारास बारमध्ये स्फोट झाला. त्यानंतर तिथे भयंकर स्थिती तयार झाली. पोलीसांकडून या आगीची नोंद करण्यात आली आहे. ही आग नेमकी का आणि कशी लागली? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Switzerland New Year bar explosion fire
Viral : गर्लफ्रेंडसोबत नव्या वर्षाच्या पार्टीत दंग, बायकोनं रंगेहात पकडले, कारची काच फोडली अन्

स्वित्झर्लंडमधील बारमधील लागलेल्या आगीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. बारमध्ये आग भडकल्यानंतर लोक सैरवैर धावत असल्याचे दिसत आहे. आरडाओरड, किंकाळ्याही ऐकू येत आहे. काही लोक बारच्या बाहेर पळत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आगीची घटना समोर येताच स्वित्झर्लंड सरकारकडून तात्काळ मदत सुरू आहे. बाधितांच्या कुटुंबांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी एअर-ग्लेशियर हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात आले आहेत.

Switzerland New Year bar explosion fire
Congress Vanchit alliance : 'वंचित'कडून काँग्रेसचा ऐनवेळी घात? महापालिका लढण्यासाठी प्यादेच नसल्याचा धक्कादायक प्रकार

स्वित्झर्लंडमधील स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, ले कॉन्स्टेलेशन बार ळघरात स्फोट झाला. त्यानंतर आग भडकली. हा बार पहाटे दोन वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला खुला असतो. या बारमध्ये ४०० च्या आसपास लोक वावरू शकतात. नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही शेकडो लोक तिथे पोहचले होते. पण १ जानेवारी रोजीच १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जखमींची परिस्थिती आणि आगीचा भडका पाहता मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Switzerland New Year bar explosion fire
कार्यकर्त्यांनो, आता तरी जिरली का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com