
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान लष्कराने पुन्हा भारतावर गोळीबार केला. यामध्ये अनेक जवानांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये जम्मू काश्मीरमधील उधमपूर सेक्टरमध्ये जवान सुरेंद्र कुमार मोगा शहीद झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसला आहे.
जवान सुरेंद्र कुमार मोगा यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. घरातील कर्ता पुरुष देशसेवेसाठी शहीद झाला. त्यांनी देशासाठी बलिदान दिले परंतु त्यांच्या जाण्याने पत्नी अन् मुलीला खूप धक्का बसला आहे. त्यांचा आक्रोश हा हृदयाला भिडणारा आहे.
सुरेंद्र कुमार मोगा हे हवाई दलात मेडिकल असिस्टंट सार्जंट म्हणून कार्यरत होते.सुरेंद्र कुमार यांनी सीमेवर आपला जीव गमावला. सुरेंद्र कुमार शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांच्या पत्नीला धक्का बसला. त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
सुरेंद्र यांची मुलगीदेखील वडिलांना मृतावस्थेत पाहून बेशुद्ध झाली. त्यांचा हा टाहो प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा आहे. वडिलांवर अंत्यसंस्कार करताना संपूर्ण गाव रडत होते. मी वडिलांचा बदला घेईन, संपूर्ण पाकिस्तान नष्ट व्हावा, असं तिने म्हटलं आहे. त्यांना एक मुलगी अन् मुलगा आहे
सुरेंद्र यांच्या पत्नीचा आक्रोश
सुरेंद्र यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात आली. यावेळी त्यांची पत्नी सीमा यांनी टाहो फोडला. त्यांनी I Love You, उठा, फक्त एकदा उठा, असं म्हणत खूप रडल्या.लष्कर अधिकाऱ्यांनी सुरेंद्र यांची वर्दी पत्नीकडे सोपवली. यावेळी त्यांनी पतीची वर्दी छातीला लावून ढसाढसा रडल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना समजावले, सगळ हवाई दल आणि देश तुमच्यासोबत आहे. पत्नी म्हणाल्या की, सगळं आहे पण सुरेंद्र माझ्याजवळ नाहीत.मला सांगा सुरेंद्रना का सोडून आलात, असं म्हणत आक्रोश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.