Surgical Strike In Balakot: बालाकोटमध्ये कोणतंही सर्जिकल स्ट्राइक झालं नाही; फक्त दहशतवाद्यांना पळवून लावलं - संरक्षण मंत्रालय

Surgical Strike News: कुठलंही सर्जिकल स्ट्राईक झालेलं नाही, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय.
Surgical Strike In Balakote
Surgical Strike In BalakoteSaam TV
Published On

Balakote News: भारतीय सैन्याने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती काही माध्यमांवर प्रसारीत करण्यात आली आहे. मात्र ही माहिती खरी नसल्याचं संरक्षण मंत्रालयाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. "काही दहशतवादी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र भारतीय सैन्याने त्यांना हुसकावून लावलंय. कुठलंही सर्जिकल स्ट्राईक झालेलं नाही.", असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय. (Latest Marathi News)

सोमवारी सकाळी बालाकोटमधील सैनिकांना दोन व्यक्ती सीमा ओलांडत असल्याचं दिसलं. हवामानाचा फायदा घेत या दोन दहशतवाद्यांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा हा डाव उधळून लवला. झालेल्या चकमकीत सैन्याकडून एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. News18 या माध्यमसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

Surgical Strike In Balakote
Ranveer-Alia's Film Promotion in Kolkata: अरेव्वा! आलिया भट्ट इथंही आघाडीवर, इंग्लिश, हिंदीच नाही, तर आणखी एक भाषा बोलते, तेही न अडखळता!

सर्च ऑपरेशनमध्ये मोठी माहिती आली समोर

सोमवारी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यात अलं. त्यानंतर सैन्याने परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी बालाकोट परिसरात त्यांना एक AK47 रायफल, 30 राउंड्स, दोन मॅगझीन, दोन ग्रेनेड्स आणि पाकिस्तानातील काही औषधं मिळाली आहेत.

माध्यमांवर चुकीची माहिती प्रसारीत

News18 या माध्यमसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केलं ही माहिती खोटी आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी काही माध्यम संस्थांनी अशी माहिती दिली की, भारतीय सैन्याने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केलं आहे. यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. ही माहिती खोटी असल्याचं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

Surgical Strike In Balakote
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नामकरण केव्हा? प्रकल्पग्रस्तांनी आज लावला बाेर्ड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com