

Supreme Court Stays Gyanvapi Masjid Survey : ज्ञानवापी मशीद परिसरात सुरू असलेल्या एएसआयच्या सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही स्थगिती असणार आहे. तर सुप्रीम कोर्टानं मुस्लिम पक्षकारांना या प्रकरणी हायकोर्टात जाण्याचा आदेश दिला.
उत्तर प्रदेशातील वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) परिसरात सुरू असलेल्या एएसआयच्या सर्वेक्षणाविरोधात मुस्लिम पक्षकारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज, सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ज्ञानवापी परिसरातील सर्व्हेला बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्थगिती दिली. तसेच मुस्लिम पक्षकारांना या प्रकरणी हायकोर्टात (High Court) जाण्याचे आदेश दिले.
मुस्लिम पक्षकार, हिंदू पक्षकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या (Uttar Pradesh Govrnment) वतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. मुस्लिम पक्षकारांनी एएसआय सर्व्हेला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) सुरुवातीला राज्य सरकारकडून उत्तर मागितलं. त्यावर कोणत्याही प्रकारचे खोदकाम झालेले नाही. परिसरात केवळ मॅपिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
मुस्लिम पक्षकारांनुसार, परिसरात आधीच सर्व्हेला स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणी बराच वेळ सुनावणी सुरू होती. यावेळी खंडपीठाने मुस्लिम पक्षकारांना हायकोर्टात जाण्याचा आदेश देतानाच एएसआय सर्व्हेला (ASI Survey) बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्थगिती देण्याचा आदेश दिला. तत्पूर्वी, आज सकाळी ७ वाजल्यापासूनच एएसआय सर्व्हे सुरू झाल्याचे सांगण्यात येत होते. यात ३० जणांच्या पथकाचा समावेश होता.
सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान हिंदू पक्षकारांनी बाजू मांडली. कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असा आदेश एएसआयच्या संचालकांना कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. मुस्लिम पक्षकारांनी आधीच कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान द्यायला हवे होते, असे हिंदू पक्षकारांकडून सांगण्यात आले. तर सुप्रीम कोर्टात एएसआय सर्व्हेसंदर्भात माहिती देताना, परिसरात केवळ व्हिडिओग्राफी आणि मॅपिंग सुरू आहे. एका आठवड्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे खोदकाम होणार नाही, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.