UP News: बलात्कार पीडित मांगलिक आहे की नाही? न्यायालयाने कुंडली तपासण्याचे दिले आदेश; काय आहे प्रकरण?

बलात्कार पीडित मांगलिक आहे की नाही? न्यायालयाने कुंडली तपासण्याचे दिले आदेश; काय आहे प्रकरण?
Supreme Court On Physical Assault Victim case
Supreme Court On Physical Assault Victim caseSaam Tv

Allahabad High Court: उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक वेगळी बातमी समोर येत आहे. येथे अलाहाबाद उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात पीडित मुलगी 'मांगलिक' (Manglik Girl) आहे की नाही? याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ज्याची दखल आता स्वतः सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशाची स्वत:हून दखल घेत हा स्थगितीचा आदेश दिला. तसेच हा आदेश गोपनीयतेच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

Supreme Court On Physical Assault Victim case
PM Modi in Odisha: दोषींना सोडणार नाही! रेल्वे अपघातस्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

काय आहे प्रकरण?

बलात्कार प्रकरणातील आरोपीने अलाहाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपीने पीडित मुलगी मांगलिक आहे, त्यामुळे तो तिच्याशी लग्न करू शकत नाही, असा युक्तिवाद केला. आरोपीचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने लखनौ विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाला बलात्कार पीडितेची कुंडली तपासण्याचे आदेश दिले. (Latest Marathi News)

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बृजराज सिंह यांनी आदेशात म्हटले होते की, ''याचिकाकर्त्याने दावा केला आहे की मुलगी मांगलिक आहे. त्यामुळे तिचा विवाह बिगर मांगलिक पुरुषाशी होऊ शकत नाही. अशा स्थितीत मुलगी खरोखरच मांगलिक आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापल्या कुंडली लखनऊ विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख प्राध्यापक यांच्यासमोर मांडल्या पाहिजेत.'' उच्च न्यायालयाने ज्योतिष विभागाच्या प्रमुखांना कुंडलींचा अभ्यास करून तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

Supreme Court On Physical Assault Victim case
Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वर पुन्हा भीषण अपघात! ट्रक उलटून चालक जागीच ठार

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या आदेशाची सर्वत्र खूप चर्चा झाली आणि अनेक वृत्तपत्रातही यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या. या संदर्भातील बातमी वाचून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आणि शनिवारी सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com