NEET Exam: नीट परीक्षा रद्द होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी; निर्णयाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष

Supreme Court Hearing Today On NEET Exam Cancellation Petition: नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे निर्णय काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
नीट परीक्षा
NEET ExamSaam Tv
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुप्रिम कोर्टात आज नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मोशन एज्युकेशन कोचिंगचे सीईओ नितीन विजय यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन बेंचसमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

नितीन विजय यांनी नीट २०२४ चा पेपर पुन्हा घ्यावा, अशी मागणी केली आहे. जर परीक्षा पुन्हा घेतली गेली नाही, तर हा चोविस लाख मुलांवर अन्याय होईल. भविष्यात आम्हाला पात्र डॉक्टर मिळू शकणार नाही, अशी मागणी याचिकेत केली (Neet Result Controversy) आहे. यावर न्यायालय काय वेगळे निर्देश देते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वीही नीट परीक्षेबाबत दाखल झालेल्या वेगवेगळ्या दोन याचिकांवर कोर्टात सुनावणी पार पडली आहे. मात्र, कोर्टाने सगळी परीक्षा पुन्हा घेण्याला नकार दिला आहे.

सुप्रीम कोर्टात याअगोदर १३ जून रोजी नीट २०२४ च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली (NEET Exam) होती. परीक्षेवरील आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच ४ जूनच्या निकालाच्या आधारे होणारे कॉउंसलिंग बंद करावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता. तर २३ जून रोजी पुनर्परीक्षा घेतली जाईल, असं स्पष्ट केलं होतं.

नीट परीक्षा
NEET Exam Scam: शिक्षणमंत्र्यांची चुप्पी माफियांसाठी तर नाही ना?, NEET परीक्षा घोटाळावरून रोहित पवारांचा सवाल

नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात (Supreme Court) आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेमध्ये ७१८, ७१९ गुण मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण (NEET Exam Cancellation Petition) आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होती. नीट परिक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

नीट परीक्षा
NEET Exam Scam: NEET चा पेपर सोडवून देणारं रॅकेट गुजरातमध्ये, प्राचार्यांसह 5 जणांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com