देशाचा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी काही ठिकाणी नीट परीक्षेमध्ये गडबड झाल्याची कबुली दिली. नीट परीक्षेच्या घोटाळ्यावरून शिक्षण मंत्र्यांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यांनी आज यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यावरून आता त्यांच्यावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत थेट शिक्षण मंत्र्यांना सवाल केला आहे. 'शिक्षणमंत्र्यांची चुप्पी माफियांसाठी तर नाही ना?', असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत शिक्षण मंत्र्यांवर टीका केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, '#NEET परीक्षा घोटाळा केवळ ग्रेस मार्क देण्यापुरता मर्यादित नाही. तर बिहार आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पेपर लीक झाल्याचंही समोर आले आहे. बिहारमध्ये तर आदल्या दिवशी मुलांना एका ठिकाणी जमवून त्यांना सर्व प्रश्न देण्यात आले आणि उत्तरांची प्रॅक्टिस करवून त्यांना सेंटरवर एकत्र सोडण्यात आले. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी #NTA कडे चौकशी केली असता NTA ने सहकार्य केलं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.'
रोहित पवारांनी थेट शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारत याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्यांनी पुढे असे लिहिले की, 'गुजरातमध्ये तर ज्यांनी पैसे दिले त्यांना उत्तरे ब्लँक ठेवण्यास सांगण्यात आले आणि नंतर पेपर झाल्यावर ती उत्तरे भरण्यात आली. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हाही दाखल केलाय. दुसरीकडं देशाचे शिक्षणमंत्री सांगतात की ‘केवळ ग्रेस देण्याचा विषय आहे, पेपर कुठंही लीक झालेले नाहीत’. '
रोहित पवारांनी पुढे असे देखील लिहिले की, 'मुळात एवढा संवेदनशील विषय असताना #शिक्षा_मंत्री एवढी गुळगुळीत भूमिका का घेत आहेत? #NEET परीक्षेत मोठे माफिया सहभागी असल्याचेही सांगण्यात येत आहे. शिक्षणमंत्र्यांची चुप्पी या माफियांसाठी तर नाही ना? त्यामुळं यावर सीबीआय चौकशी व्हायलाच हवी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हवा. महाराष्ट्रातील पदभरती परीक्षांमध्ये होत असलेल्या घोंटाळ्यांचा #माफिया_राज आता संपूर्ण देशभर पसरत आहे की काय अशी शंका येत आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.