Court News: सेवानिवृत्तीनंतर दत्तक मुलांना पेन्शन नाकारता येणार नाही; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी

Punjab And Haryana High Court Decision: सेवानिवृत्तीनंतर दत्तक घेतलेल्या मुलांना पेन्शन लाभापासून वंचित ठेवता येणार नाही, असे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे.
Court News: सेवानिवृत्तीनंतर दत्तक मुलांना पेन्शन नाकारता येणार नाही; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी
Punjab And Haryana High CourtSaamtv
Published On

कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलांना फक्त दत्तक घेतलेल्या तारखेनुसार कौटुंबिक निवृत्ती वेतन देण्यात कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही, असे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab And Haryana Court) स्पष्ट केले आहे. सेवानिवृत्तीनंतर दत्तक घेतलेल्या मुलांना पेन्शन लाभापासून वंचित ठेवता येणार नाही, असे देखील हायकोर्टाने सांगितले. न्यायमूर्ती त्रिभुवन दहिया यांनी हरियाणातील (Haryana) इज्जर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विकास कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला.

विकास कुमार यांनी हरियाणा सरकारचा १४ फेब्रुवारी २०१९ चा आदेश रद्द करण्याची मागणी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडे केली होती. हरियाणा सरकारच्या आदेशानुसार, त्यांचा कौटुंबिक पेन्शनसाठीचा दावा नाकारण्यात आला होता. २४ सप्टेंबर २०१२ पासून वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत व्याजासह कौटुंबिक पेन्शन जारी करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागिणी त्यांनी केली होते.

याचिकाकर्ता विकास कुमार यांचे वडील ४ जुलै १९७० रोजी लष्करातून निवृत्त झाले होते आणि त्यांना लष्करी पेन्शन मिळण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर २७ सप्टेंबर १९७१ मध्ये ते हरियाणा सरकारमध्ये गार्ड या पदावर रुजू झाले आणि या पदावर त्यांना बढती देखील मिळाली होती.

Court News: सेवानिवृत्तीनंतर दत्तक मुलांना पेन्शन नाकारता येणार नाही; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी
Kanchanjunga Express Accident : प्रवाशांच्या किंचाळ्या अन् धावा; भीषण रेल्वे अपघाताची थरकाप उडवणारी दृश्ये, PHOTO

३१ जुलै १९८७ रोजी सेवानिवृत्तीनंतर त्यांनी याचिकाकर्ता विकास कुमारला १ मार्च २००० रोजी मुलगा म्हणून दत्तक घेतले. परंतु २६ जानेवारी २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. विकास कुमारने संबंधित विभागाकडून कौटुंबिक निवृत्ती वेतनाचा दावा केला होता परंतु त्यांना अद्याप पेन्शन देण्यात आलेली नाही. याबाबत संबंधित विभागाकडून कोणतेही कारण देण्यात आले नव्हते.

त्यामुळे विकास कुमार यांनी याप्रकरणी थेट हायकोर्टात याचिका दाखल करत हरियाणा सरकारचे पेन्शनबाबतचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने 'सेवानिवृत्तीनंतर दत्तक घेतलेल्या मुलांना पेन्शन लाभापासून वंचित ठेवता येणार नाही.', असे स्पष्टपणे सांगितले.

Court News: सेवानिवृत्तीनंतर दत्तक मुलांना पेन्शन नाकारता येणार नाही; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी
Uttar Pradesh Train Fire: धावत्या मालगाडीला अचानक आग; पाहता पाहता लाखोंचा कोळसा जळून खाक, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com