Hemant Soren Hearing : हेमंत सोरेन यांना निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Hemant Soren Supreme Court Hearing : नियमित जामीनावर सुनावणी होईपर्यंत निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी सोरेन यांनी याचिकेत केली आहे.
Hemant Soren  Supreme Court Hearing
Hemant Soren Supreme Court HearingSaam TV

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोरेन यांना अटक केली आहे. याच अटकेला सोरेन सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

Hemant Soren  Supreme Court Hearing
Haryana Political Crisis: हरियाणा सरकार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत, मुख्यमंत्री सैनी बहुमत सिद्ध करणार?

नियमित जामीनावर सुनावणी होईपर्यंत निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी सोरेन यांनी याचिकेत केली आहे. याच खंडपीठाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.

त्यामुळे आज सोरेन यांनाही जामीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने ३१ जानेवारीला अटक केली होती. तेव्हापासून ते होटवार येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आहे.

ईडीने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंड उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी याचिका दाखल केली होती. अटकेविरोधात न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन द्यावा, असं सोरेन यांनी याचिकेत म्हटलं होतं.

मात्र, 3 मे रोजी झारखंड उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. तुमची अटक कायदेशीरच आहे, असं कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सोरेन आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. दरम्यान, 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सोरेन यांची आणखी एक याचिका निकाली काढली होती.

त्यात त्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निकाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले होते. दरम्यान, अगदी दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी २१ दिवसांचा जामीन मंजूर केला. त्यामुळे आता खंडपीठ सोरेन यांना देखील जामीन मंजूर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Hemant Soren  Supreme Court Hearing
Delhi News: दिल्लीतील 2 रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलीस हाय अलर्ट मोडवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com