Sunita Williams: अंतरळात सुनीता विल्यम्स 'या' देवाची मूर्ती घेऊन गेल्या होत्या, ९ महिने केली मनोभावे पूजा

Sunita Williams Family Reaction: सुनिता विल्यम्स या तब्बल ९ महिने १४ दिवसानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांच्या येण्याने कुटुंबियांना खूप जास्त आनंद झाला आहे. याबाबत त्यांच्या बहिणीने माहिती दिली आहे.
Sunita Williams
Sunita WilliamsSaam Tv
Published On

भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स तब्बल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. नासाच्या एका मोहिमेसाठी त्या अंतराळात गेल्या होत्या. त्यानंतर आता त्या ९ महिने १४ दिवसानंतर पृथ्वीवर परत आल्या आहेत. फ्लोरिडामध्ये त्यांचं यानं लँड झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वजण सुनिता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर येण्याची वाट पाहत होते. यासाठी त्यांचे मूळ गाव म्हणजेच त्यांचे पूर्वज जिथे राहत होते तिथे वेगवेगळ्या पूजा केल्या जात होत्या.

Sunita Williams
Sunita Williams : वेलकम ऑन अर्थ.. ९ महिन्यानंतर सुनीता विल्यम्स परतल्या, गुजरातमध्ये जल्लोष

आता सुनिता विल्यम्स परतल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सुनिता या अंतराळात जाण्यापूर्वी त्यांनी पूजा आणि हवन केले होते. याबाबत त्यांची चुलत बहिण फाल्गुनी पंड्याने माहिती दिली आहे. सुनिता यांच्या मोठ्या भावानेही त्यांच्या मूळ गावात पूजा केली आहे.

फाल्गुनी पंड्या या सुनिता विल्यम्स यांच्या चुलत बहीण आहे. त्यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. सुनिता परत यावी, म्हणून आम्ही मंदिरात पूजा आणि हवन करणार आहोत. सुनिता अंतराळात जाताना गणेशाची मूर्ती घेऊन गेली होती. तिने मला अंतराळ केंद्रावरील गणेशाचे फोटो पाठवले होते, असं त्यांनी सांगितलं.

सुनीता विल्यम्स या मूळच्या भारतीय वंशाच्या आहे. तिचे पूर्वज भारतात राहायचे. तिच्या पूर्वजांचे गाव भारतातील झूलासन आहेत. सुनिताच्या प्रवासाबद्दल तिच्या वडिलांनीही माहिती देत असतात. फाल्गुनी यांनी सांगितले की,जेव्हा मी कुंभमेळ्यात गेलो होतो तेव्हा इकडचे फोटो तिला पाठवले होते. त्यानंतर तिनेदेखील अंतराळातून कुंभमेळ्याचे फोटो पाठवले. ते फोटो खूप सुंदर होते.मागील आठवड्यात मी तिला फोन केला होता. ती ९ महिन्यानंतर परतणार असल्याने आम्हाला आनंद आहे.

Sunita Williams
Sunita Williams Return : सुनीता विलियम्स अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार, नासाची तयारी पूर्ण, केव्हा होणार लँडिंग?

सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या मूळ गावात जल्लोष करण्यात आला आहे. त्यांच्या गावत अनेक यज्ञ आणि पूजा आयोजित केल्या होत्या. सुनीता यांच्याबाबत मोठा भाऊ दिनेश यांनीही माहिती दिली आगे. सुनीता ९ महिन्यात अंतराळात होत्या. घरातील सर्वांनाच त्यांची चिंता लागली होती. कुटुंबातील सर्वजण चिंतेत होते. परंतु आता सुनीता परत येणार असल्याचे कळल्याने आनंद होत आहे, असं दिनेश म्हणाले.

Sunita Williams
Sunita Williams: अंतराळवीर सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतणार, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com