पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील मशिदीजवळ शुक्रवारी आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये 52 जणांचा मृत्यू झाला, तर 130 जण जखमी झाले. मृतांमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीसाठी लोक जमत असताना हा हल्ला झाला. डीएसपी नवाज गिश्कोरी यांच्या कारजवळच हा स्फोट झाला. (Crime News)
जिओ न्यूजच्या माहितीनुसार, या हल्ल्यात डीएसपी नवाज गिश्कोरी यांचा देखील मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानचे काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गरज पडल्यास जखमींना कराचीलाही हलवण्यात येईल. जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल. (Latest Marathi News)
अचकझाई पुढे म्हणाले की, आमच्या शत्रूंना विदेशी शक्तींच्या मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून शांतता बिघडवायची आहे. असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. बलुचिस्तानमधील सरकारी मंत्री आणि इतर अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.