Crime News : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या आईची हत्या, तृणमूलच्या नेत्याला अटक

West Bengal Crime News : कानन रॉय (६२) असे मृत महिलेचे नाव आहे.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

West Bengal News :

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या आईची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) च्या समर्थकांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव भागात 27 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे.

कानन रॉय (६२) असे मृत महिलेचे नाव आहे. भाजपचे स्थानिक नेते जयंत रॉय यांच्या त्या आई आहेत. कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी स्थानिक टीएमसी नेते समीर मलिकला अटक केली आहे.

Crime News
Mumbai-Pune News : गणपती मिरवणुकीला गालबोट; मुंबईत तरुणावर चाकू हल्ला, तर पुण्यात दोन गटात तुफान राडा

समीर मलिक अनेकदा कानन रॉय यांच्या कुटुंबियांशी गैरवर्तन करत असे, असा स्थानिकांचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी तो कानन आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत होता. मृत महिलेचा मुलगा आणि भाजप कार्यकर्ता जयंत रॉय यांनी तेव्हा विरोध केला असता समीर आणि त्याच्या गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)

हे पाहून त्याचे वृद्ध आई-वडील आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे आले. याच मुद्द्यावरून समीरने जयंतच्या आई-वडिलांना मारहाण केली. समीरने जयंतची आई कानन यांच्या डोक्यावर काठीने वार केले, त्यानंतर त्या जमिनीवर कोसळल्या. स्थानिक लोकांनी त्यांना चांदपाडा ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं. मात्र तिथे त्यांन डॉक्टरांनी मृत घोषित केले. (Crime News)

Crime News
Pakistan Fight Viral Video : पाकिस्तानात दोन नेते LIVE शोमध्ये भिडले; एकमेकांना अक्षरश: लाथाबुक्क्यांनी तुडवलं

मृत महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केली की, आम्ही भाजपला पाठिंबा दिला म्हणून राजकीय वैमनस्यातून समीर मलिकने कानन यांची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचं जयंत रॉय यानी म्हटलं आहे. पोलीस या घटनेचा अधित तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com