VIDEO : भरचौकात पंडित नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड; धक्कादायक व्हिडिओ समोर

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथन यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे
Jawaharlal Nehru Statue Madhya Pradesh
Jawaharlal Nehru Statue Madhya PradeshSaam TV
Published On

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सतना जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची (Jawaharlal Nehru Statue) काही लोकांनी तोडफोड केली आहे. सतना शहरातील चौकात असलेल्या पुतळ्याची तोडफोड करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथन यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. (Madhya Pradesh Jawaharlal Nehru Statue vandalized)

Jawaharlal Nehru Statue Madhya Pradesh
राज्यसभेसाठी संजय राऊत, संजय पवार यांची उमेदवारी निश्चित; आज अर्ज भरणार

कमलनाथन यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लिहलं आहे की, "हा व्हिडिओ मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे. यामध्ये काही समाजकंटक देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची विटंबना करताना दिसून येत आहेत. ही घटना अत्यंत निंदनीय आहे." या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पुतळ्याच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार समोर येताच कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नेहरू यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी कॉंग्रेसने निषेध रॅली देखील काढली. पोलिसांनीही आता या घटनेची दखल घेतली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सहा जणांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com