राज्यसभेसाठी संजय राऊत, संजय पवार यांची उमेदवारी निश्चित; आज अर्ज भरणार

राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे आज संजय राऊत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Sanjay Raut News, Sanjay Pawar News, Maharashtra Rajyasabha Election 2022 Latest News
Sanjay Raut News, Sanjay Pawar News, Maharashtra Rajyasabha Election 2022 Latest NewsSaam Tv

मुंबई : राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे (Shivsena) आज (26 मे) संजय राऊत (Sanjay Raut) राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी 1 वाजता विधान भवनात ते दाखल होणार असून, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे देखील यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती स्वतः राऊत यांनी दिली. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. संजय राऊत यांच्याबरोबर कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावावर दुसऱ्या जागेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. (Maharashtra Rajyasabha Election 2022 Latest News)

Sanjay Raut News, Sanjay Pawar News, Maharashtra Rajyasabha Election 2022 Latest News
त्र्यंबकेश्वरमध्ये अपेक्षित तेवढा विकास झाला नाही : साक्षी महाराज

बुधवारी संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. गुरूवारी अर्ज भरणार असल्याने पवारसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसेच सेनेच्या दोन्ही उमेदवारांमागे महाविकास आघाडी भक्कमपणे असल्याने दोन्ही उमेदवार गुलाल उधळतील, अशी ग्वाहीही पवारांनी दिल्याचं राऊत यांनी सांगितलं.

संभाजीराजे यांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, "संभाजीराजेंना शिवसेनेची 42 मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे. मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालोजीराजे, स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत" असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com