Special Report : एड्स आजारावर आला रामबाण उपाय? दोन इंजेक्शनने एड्स पूर्णपणे बरा होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Aids Medicine Viral message : दक्षिण आफ्रिका आणि युगांडाने एड्सवरील चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. लेनकापावीर असं औषधाचं नाव असून दोन इंजेक्शनने एचआयव्हीवर पूर्ण संरक्षण होतं असा दावा केला आहे.
Special Report
Special ReportSaam Digital
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

आता बातमी आहे एका व्हायरल मेसेजची. एड्स हा गंभीर आजार पूर्णपणे बरा होतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. देशात हजारो रुग्ण एड्सचे आहेत. त्यामुळे हा दावा खरा असेल तर याचा अनेकांना फायदा होणाराय. त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे. याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा...

एड्स हा गंभीर आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी अजूनही औषध आलेलं नाही. एड्स झालेल्या रुग्णांना गंभीर वेदना होतात. माणसाचा खंगून खंगून मृत्यू होतो. मात्र, एड्स पूर्ण पणे बरा होऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल झालाय. त्यामुळे मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

एड्स इंजेक्शनने पूर्ण बरा होऊ शकतो. नवीन अँटिव्हायरल औषधाचे वर्षातून दोन वेळा इंजेक्शन घेतल्याने महिलांमधील एचआयव्ही पूर्णपणे बरा झाल्याचे समोर आले आहे. हा दावा केल्याने एड्स असलेल्या अनेक रुग्णांच्या आशा पल्लवीत झाल्यायत. देशात हजारो एड्सचे रुग्ण आहेत. गेल्या वर्षी, जागतिक स्तरावर १३ लाख लोकांना एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. मात्र २०१० मध्ये आढळलेल्या २० प्रकरणांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. असे असले तरीही २०२५ पर्यंत जगात एचआयव्ही नवी प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी किंवा २०३० पर्यंत एड्सला संपविण्याचे यूएनएड्सचे लक्ष पूर्ण करणे कठीण आहे.त्यामुळे हा दावा खरा आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.. याबद्दल अधिक माहिती तज्ज्ञ देऊ शकतात... तज्ज्ञांकडून याबद्दल माहिती घेतली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहा

Special Report
NEET Exam Paper Leak Case : NEET परीक्षेसंदर्भात मोठी बातमी! विद्यार्थ्यांचे गुण वेबसाईटवर प्रसिद्ध होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश

व्हायरल सत्य

दक्षिण आफ्रिका आणि युगांडाने चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केलाय

लेनकापावीर असं औषधाचं नाव आहे

दोन इंजेक्शनने एचआयव्हीवर पूर्ण संरक्षण होतं असा दावा

भारतात एड्सवर अजूनही संशोधन सुरू आहे

एड्स झालेल्या रुग्णांना आयुष्याचा शेवट झाल्यासारखे वाटते. मात्र आता एका चाचणीनंतर नवी आशा निर्माण झालीय. दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये 'लेनकापावीर' असे या औषधाचे नाव असून, ते लवकरच कमी दरात बाजारात येणार आहे. दररोज घेतलेल्या इतर दोन औषधी गोळ्यांपेक्षा ते अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, भारतात अजून यावर संशोधन सुरू आहे.त्यामुळे एड्स होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे.

Special Report
Jammu Kashmir Terrorist Attack: कुपवाडात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री; २ दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com