देशातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत असताना, समाजवादी पक्षाकडून ही पुनरागमनाचे दावे केले जात आहेत. मात्र, आता समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या दाव्यांवर त्यांच्या संभाव्य आघाडीतीलच कॉँग्रेसच्या नेत्यांकडून पलटवार होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील दोन खासदारांमध्ये शाब्दिक सामना रंगला आहे. कैराना मतदारसंघाच्या समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन यांनी उत्तर प्रदेशात भाजपला पराभूत करण्यासाठी अखिलेश यादव हेच सक्षम नेतृत्व असल्याचा दावा केला आहे. इकरा हसन यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटलं की, उत्तर प्रदेशात काँग्रेसला स्वबळावर विशेष यश मिळवता येणार नाही. भाजपला पराभूत करण्याची क्षमता केवळ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यात आहे, असा दावा त्यांनी केला. काँग्रेससोबत आघाडी कायम राहिली तर ते चांगलंच आहे.आघाडी झाली नाही, तरी त्याचा फटका समाजवादी पक्षाला नव्हे तर काँग्रेसलाच बसेल, असंही इकरा हसन यांनी म्हटलं.
इकरा हसन यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे सहारनपूरचे खासदार इमरान मसूद यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. इमरान मसूद म्हणाले की, इकरा हसनही एकट्या हे करू शकत नाहीत. त्यात अडचण काय आहे? इकरा आमची मुलगी आहे, आमच्या भाचीसारखी आहे.
यावेळी इमरान मसूद यांनी विरोधकांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची गरज असल्याचं सांगितलं. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडूनही यापूर्वी अशीच अनेक वक्तव्ये केली जात होती. मात्र, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची काय परिस्थिती झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनी सोबत येऊन निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.