चिंताजनक! दक्षिण कोरियाच्या हनुल अणुऊर्जा प्रकल्पाशेजारील जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी!

हि आग जर वेळेत आटोक्यात नाही आली तर मोठा अनर्थ घडू शकतो ज्याची कल्पनाही होऊ शकत नाही.
चिंताजनक! दक्षिण कोरियाच्या हनुल अणुऊर्जा प्रकल्पाशेजारील जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी!
चिंताजनक! दक्षिण कोरियाच्या हनुल अणुऊर्जा प्रकल्पाशेजारील जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी! SaamTvNews
Published On

दक्षिण कोरियाच्या पूर्वेकडील किनारपट्टीच्या उलजिन प्रांतात असणाऱ्या हनुल अणुऊर्जा प्रकल्पाला लागून असलेल्या जंगलात वणवा पेटल्याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.

रॉयटर्सच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'दक्षिण कोरियाच्या उलजिन काउंटीमधील अणु प्रकल्पाजवळ जंगलात भीषण आग लागली आहे.'

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी शुक्रवारी हनुल अणुऊर्जा प्रकल्पाला पूर्वेकडील किनारपट्टीच्या उलजिन प्रांतात लागलेल्या वणव्यापासून संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले, असे दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

दक्षिण कोरियाच्या सरकारने या वणव्याबाबत गंभीर इशारा देत नैसर्गिक आपत्तीबाबत अलर्ट जारी केला आहे. या आगीपासून काहीच अंतरावर कोरिया हायड्रो अँड न्यूक्लियर पॉवर या कंपनीमार्फत आण्विक दाब असलेल्या पाण्याच्या सहा अणुभट्ट्या चालवण्यात येतात. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com