रोहित कदम, साम टीव्ही
नीट पेपरफुटी प्रकरणी देशातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर काँग्रेसनंही पाठिंबा दिलाय. वांगचूक गेल्या 20 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र काँग्रेसचा कोणताही नेता त्यांच्या भेटीला गेला नव्हता. विरोधी पक्षांमधल्या अनेक नेत्यांनी त्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. अखेर वीसाव्या दिवशी काँग्रेस नेते पवन खेरा यांनी जंतर-मंतरवर वांगचुक यांची भेट घेतलीये.
तर दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही सोनम वांगचुक यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. संसदेत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचंही सुळेंनी यावेळी म्हटलंय...
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २० जुलैला संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी या मोर्चात किती पक्षांचे खासदार सहभागी होणार याबाबत उत्सुकता आहे. तसंच राहुल गांधींच्या सहभागाकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे २० जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या ही लढाई संसदेतही तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी सरकार प्रधानांचा राजीनामा घेऊन विरोधाची धार कमी करणार की आठमुठी भूमिका कायम ठेवणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.