S N Subrahmanyan : 'बायकोचं तोंड किती वेळ पाहणार?' सीईओंचं विधान, दीपिका पदुकोणचा संताप, VIDEO

लार्सन अँड टुब्रोचे सीईओ एसएन सुब्रमण्यन सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत...सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करावं असं विधान केलंय...नेमकं त्यांनी हे विधान का केलं? आणि त्यांच्या या विधानावर अभेनेत्री दीपिका पदुकोन का संतापली त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...
'बायकोचं तोंड किती वेळ पाहणार?' सीईओंचं विधान, दीपिका पदुकोणचा संताप, VIDEO
S N Subrahmanyan statement Saam tv
Published On

एल अँड टीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी एका आठवड्यात 90 तास काम करायचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सुब्रह्मण्यन त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत होते. यावेळी त्यांनी एका आठवड्यात 90 तास काम करण्याचं समर्थन केलं. यासह मला खेद वाटतो की मी तुमच्याकडून रविवारी काम करुन घेऊ शकत नाहीत. त्यात घरी बसून बायकोचं तोंड किती वेळ पाहणार असंही त्यांनी म्हटल्यानं सिनेविश्वापासून ते उद्योग जगतातील दिग्गजांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. L&Tच्या सीईओनं नेमकं काय वक्तव्य केलंय पाहूयात...

काही महिन्यांपूर्वी नारायण मूर्तींनीही 70 तास काम करा म्हणजे भारताला नंबर वन करता येईल असं विधान केलं होतं. त्यानंतर मुर्तींवरही बरीच टीका झाली होती. त्यानंतर वर्क लाईफ बॅलेन्स बाबत वारंवार बोलले जातयं. त्यावरुनच अभिनेत्री दीपिका पादूकोणनं तिखट प्रतिक्रीया देत एल अँड टीचे सीईओ सुब्रह्मण्यन यांच्यावर टीकेची झोड उठवलीये.

गेल्या वीस एक वर्षात कॉर्पोरेट कल्चर हे चांगलंच रूजलं तसे त्याचे फायदे-तोटे, नव्या संकल्पना, राजकारण, मॅनेजमेंट, कामाचा तणाव, मेंटल हेल्थ याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होऊ लागलायं...सरकारी नोकरी म्हणजे आराम हे दिवस गेले आणि कॉर्पोरेट मजूर अशी बिरुदावली यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंमतीनं जोडली गेलीये. मात्र प्रामाणिक कर्मचाऱ्यांपेक्षा 500 पट अधिक पगार घेणाऱ्या चेअरमनचा खिसा आणि भविष्य सुरक्षित असल्यानं कदाचित त्यांना कंपनीसाठी मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची किंमत नसावी असंच वाटतं...त्यामुळेच अशा सीईओंना थेट घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com