चंदीगड: पंजाबमधील अमृतसरच्या अटारीजवळ पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीत एक गँगस्टर मारला गेला. तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अमृतसर जिल्ह्यातील अटारीमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेजवळील चिचा भकना गावात ही चकमक झाली. जवळपास तीन तासांपासून धुमश्चक्री सुरू आहे. चकमकीत मारला गेलेला गँगस्टर हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अटारी गावात सहा ते सात गँगस्टर लपून बसल्याची माहिती मिळाली होती. हे सर्व गुंड गावातील जुन्या हवेलीत लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाब पोलिसांना (Punjab) मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्याकांडाशी संबंधित गँगस्टर या गावात लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पंजाब पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याचवेळी दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरू झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार, गँगस्टर रूपा आणि त्याचा साथीदार मन्नू कुसा त्या ठिकाणी लपून बसले होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. तसेच संपूर्ण परिसर घेरण्यात आला.
दुसरीकडे, गावात लपून बसलेल्या गँगस्टरकडून पोलिसांवर गोळीबार झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. दोन्ही गँगस्टर सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी असल्याचा संशय आहे. दोन्ही आरोपी पंजाबच्या तरनतारन येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन्हीही आरोपी गँगस्टर हे लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारच्या गँगमधील शार्प शूटर असल्याची माहिती आहे. यापूर्वी पोलिसांनी बिश्नोई गँगच्या एका शार्प शूटरला अटक केली होती. अंकित सिरसा या शार्प शूटरने मुसेवाला याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती आहे. अंकितच्या आधी प्रियव्रत याला पोलिसांनी अटक केली होती. तर सचिन भिवानी याने सिद्धू मुसेवाला प्रकरणातील चार शूटर्सना आसरा दिला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.