Shocking News : मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी नव्या नवरीने दिला बाळाला जन्म, नवरा म्हणाला, 'हे माझं मूल नाही..'

Viral News : प्रयागराजमधील एका तरुणाचे लग्न झाले. पण लग्नाच्या दोन दिवसांनी त्याच्या बायकोने एका बाळाला जन्म दिला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या तरुणाने बाळाचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे.
Bride gives birth day after wedding husband got angry
Bride gives birth day after wedding husband got angryMeta Ai
Published On

Viral News in Marathi : लग्न झाल्यानंतर काहींच्या घरात वर्षभरात पाळणा हलतो. तर काही जोडपी प्लॅन करुन बाळाला जन्म देतात. पण लग्नानंतर दोन दिवसांनी नव्या नवरीने बाळाला जन्म दिल्याचे तुम्ही ऐकले आहे का? ही अशी घटना उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये घडली आहे. लग्न झाल्यावर नवरीला बाळ झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील एका तरुणाचे २४ फेब्रुवारी रोजी लग्न झाले. लग्न झाल्यानंतर तरुण, त्याची नवी नवरी आणि कुटुंबीय घरी परतले. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सर्व विधी पूर्ण करण्यात आल्या. २६ फेब्रुवारी रोजी तरुणाच्या नव्या नवरीच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. रुग्णालयात नेल्यानंतर नवरी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गरोदरपणामुळे नवरीच्या पोटात दुखत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला डिलीव्हरी वॉर्डमध्ये दाखल केले. या प्रकरणाची माहिती मिळताच तरुणाच्या कुटुंबीयांनी नवरीच्या माहेरी संपर्क केला. त्याच दरम्यान नव्या नवरीने एका मुलाला जन्म दिला. तेव्हा तरुणाने हे मूल माझे नाही म्हणत बाळाचा स्वीकार करण्यास साफ नकार दिला.

Bride gives birth day after wedding husband got angry
Maharashtra Politics : औरंगजेब क्रूर नव्हता, त्याच्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती, आमदाराचं वादग्रस्त विधान

मार्च २०२४ मध्ये लग्न ठरले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना अनेकदा भेटले होते, असा दावा नवरीच्या माहेरच्यांनी केला आहे. तर तरुणाने आणि त्याच्या घरच्यांनी नवरीला आणि तिच्या बाळाला स्विकारण्यास नकार दिला आहे. वादानंतर नवरी तिच्या माहेरी परतली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Bride gives birth day after wedding husband got angry
Kalyan Station : कल्याण स्टेशन परिसरात वाहतुकीत बदल; कुठे प्रवासाला बंदी? पर्यायी मार्ग कोणते? वाचा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com