Shocking: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, वर्गमित्रानेच केलं भयंकर कृत्य; कॉलेजच्या बाथरूमध्ये खेचत नेलं नंतर...

Bengaluru Crime News: दक्षिण बेंगळुरूमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनीवर वॉशरूममध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. २१ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे.
bengaluru crime
bengaluru crimeSaam Tv
Published On

दक्षिण बेंगळुरूमधील एका खाजगी इंजिनीअर महाविद्यालयात घडलेल्या अत्यंत गंभीर घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये पुरुषांच्या वॉशरूममध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात २१ वर्षीय विद्यार्थ्याला पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी सहाव्या सेमिस्टरमध्ये शिकत होता आणि त्याच संस्थेत सातव्या सेमिस्टरची विद्यार्थिनी असलेल्या पीडितेसोबत त्याची ओळख होती.

bengaluru crime
Shocking: ५ मुलांची आई प्रेमात पडली, नवऱ्याने नको त्या अवस्थेत प्रियकरासोबत पकडले, पुढे जे झालं ते वाचून थरकाप उडेल

ही घटना १० ऑक्टोबर रोजी घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीला बुधवारी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पीडित विद्यार्थिनीने या घटनेबाबत १५ ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ती काही वस्तू घेण्यासाठी आरोपीला भेटायला गेली होती त्यानंतर वॉशरूममध्ये या भयंकर प्रकाराची घटना घडली.

bengaluru crime
Shocking Accident: काळीज पिळवटणारी घटना! बायकोचं अपघाती निधन, मृतदेहाला कवेत घेऊन नवऱ्याने फोडला टाहो

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये बलात्कारासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला असून, साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थीवर्ग आणि पालकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, संस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

bengaluru crime
Crime News: नववधूला मारहाण करून गळा दाबून हत्या केली, नंतर अपघाताचा बनाव रचला, पोलिसांनी केली पोलखोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com