Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

Delhi Shoking News : दक्षिण दिल्लीतील दक्षिणपुरी भागात एका बंद खोलीत चार पुरूषांचे मृतदेह आढळले. हे सर्वजण एसी मेकॅनिक होते. गुदमरल्याने मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून तपास सुरू आहे.
Delhi Shoking News
Delhi Shoking News Saam Tv
Published On

राजधानी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका घराच्या बंद दारा आड ४ मृतदेह आढळले आहेत. या घटनेने दिल्ली हादरली आहे. ही घटना शनिवारी घडली असून पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.

दिल्लीतील दक्षिणपुरी भागात शनिवारी पोलिसांना एकाच घरात चौघांचे मृतदेह आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चारही जण पुरूष आहेत. यामध्ये दोन भावांचा समावेश आहे. हे सर्वजण एसी मेकॅनिक म्हणून काम करत होते. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला, जिथे चारही मृतदेह आढळले.

Delhi Shoking News
Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

प्राथमिक तपासात पोलिसांना गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. खोली सर्व बाजुंनी होती आणि दरवाजा बंद होता. तथापि, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आणि जवळच्या लोकांची चौकशी केली जात आहे. घटनास्थळावरून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावले आहे.

Delhi Shoking News
Delhi Crime: पेशंटकडून महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार, पीडितेचा मृत्यू; रुग्णालयात काळीमा फासणारी घटना

पोलिसांचे म्हणणे आहे की, सध्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. पीएम रिपोर्ट आल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल आणि मृत्यूचे कारण कळेल. तोपर्यंत परिसरातील लोकांची चौकशी केली जात आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती गोळा केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com