Shocking: तरुणीने एक्स बॉयफ्रेंडच्या बायकोला दिलं HIV इंजेक्शन, लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात गेला
Andhra Pradesh CrimeSaam Tv

Shocking: तरुणीने एक्स बॉयफ्रेंडच्या बायकोला दिलं HIV इंजेक्शन, लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात गेला

Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली. एक्स बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याच्या रागात तरुणीने भयंकर कृत्य केले. तिने त्याच्या बायकोला एचआयव्ही इंजेक्शन दिले. या घटनेमुळे खळबळ उडाली.
Published on

Summary -

  • एक्स बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याचा राग तरुणीच्या डोक्यात गेला

  • एक्स बॉयफ्रेंडच्या डॉक्टर बायकोला HIV संक्रमित इंजेक्शन दिले

  • चार आरोपींना पोलिसांनी अटक केली

  • न्यायालयीन कोठडीत आरोपींची रवानगी

एक्स बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिला होता याचा राग मनात ठेवत एका महिलेने त्याच्या बायकोला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले. ही घटना आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. आरोपी महिलेचा एक्स बॉयफ्रेंड हा डॉक्टर आहे आणि त्याची बायको देखील डॉक्टर आहे. एक्स बॉयफ्रेंडने तिच्यासोबत लग्न न केल्याने आणि दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केल्याचा राग महिलेच्या डोक्यात होता. याच कारणावरून तिने हे भयंकर कृत्य केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्नूलमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या एका डॉक्टरचे आणि अदोनी येथील एका महिलेचे प्रेमसंबंध होते. पण नंतर काही कारणांवरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाले आणि ते वेगळे झाले. त्यानंतर डॉक्टरने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. ज्या महिलेसोबत डॉक्टरने लग्न केले ती देखील डॉक्टरच आहे. ती सध्या एका वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करते

एक्स बॉयफ्रेंडने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केले हे महिलेला अजिबात आवडले नव्हते. त्यामुळे तिने एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या बायकोला वेगळं करण्यासाठी कट रचला. या कटाचा एक भाग म्हणून, ९ जानेवारीला दुपारी महिला डॉक्टर घराच्या दिशेने येत होती तेव्हा चार तरुणांनी तिच्या कारला धडक दिली होती. त्यानंतर या आरोपींनी मदत करण्याच्या बहाण्याने तिला ऑटो रिक्षामध्ये बसवलं आणि तिला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले.

Shocking: तरुणीने एक्स बॉयफ्रेंडच्या बायकोला दिलं HIV इंजेक्शन, लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात गेला
Mumbai Crime: मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसरची हत्या, नेमकं लोकलमध्ये काय घडलं? घटनेचा थरारक VIDEO समोर

या घटनेनंतर पीडित डॉक्टरच्या नवऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चारही आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक केली. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींची ओळख पटली आहे. बी. बोया वसुंधरा (३४ वर्षे), एका खाजगी रुग्णालयातीस परिचारिका काँग ज्योती (४० वर्षे) आणि तिची दोन मुलं जे २० वर्षांचे आहेत. महिलेने या सर्वांसोबत हा कट रचला होता. २४ जानेवारी रोजी पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करण्यात आली.

Shocking: तरुणीने एक्स बॉयफ्रेंडच्या बायकोला दिलं HIV इंजेक्शन, लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात गेला
Pune Crime : पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते धंदे; पोलिसांनी सापळा रचला अन् पुढे जे घडलं ते...

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्ताचे नमुने घेतले. जेव्हा संक्रमित व्यक्तींनी नमुने घेण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की ते संशोधनासाठी घेतले जात आहेत. आरोपीचा दावा आहे की त्याने संक्रमित रक्त रेफ्रिजरेटरमध्ये साठवले आणि नंतर तेच नमुने पीडितेमध्ये इंजेक्शन दिले. पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १२६ (२), ११८(१), २७२ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सुरू आहे.

Shocking: तरुणीने एक्स बॉयफ्रेंडच्या बायकोला दिलं HIV इंजेक्शन, लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात गेला
Crime: नालासोपारा हादरले! आईने पोटच्या १५ वर्षीय मुलीचा घेतला जीव, खलबत्ता डोक्यात घातला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com