
केरळमध्ये एका २४ वर्षीय मुलीला प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. तिरुअनंतपुरमच्या एका स्थानिक न्यायालयाने ग्रीष्मा नावाच्या मुलीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावलीय. या मुलीने आपला प्रियकर शेरॉन राजची हत्या केली होती. या मुलीने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी विषारी पदार्थ खाऊ घालत हत्या केली होती.
आयुर्वेदिक औषधात विष कालवून शेरॉनला खाऊ घातलं होतं. त्यानंतर शेरॉनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अकरा दिवसांच्या उपचारानंतर प्रियकर शेरॉनचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीय. शिक्षा सुनावताना न्यायालयाने सांगितले की, हा गुन्हा गंभीर असून, दोषींविरुद्ध कोणतीही हयगय केली जाणार नाही. दरम्यान या प्रकरणात कोणताच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता परंतु पोलिसांनी योग्यप्रकारे या हत्याकांडाचा छडा लावला.
योग्य तपास करत मारेकरी प्रेयसीला अटक केल्याने न्यायालयाने पोलीस यंत्रणेचं कौतुक केलं आहे. ग्रीष्माने शेरॉनसोबतचे नाते संपवण्याचा प्रयत्न केला होता, असं न्यायालयाने न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यावरून सांगितलं. ग्रीष्माने ज्योतिषने वर्तवलेल्या भविष्यामुळे हत्या केली. तिला सांगण्यात आलं होतं की तिचा नवरा तिच्या आधी मृत पावेल. यामुळे शांततेत दुसरं लग्न करण्यासाठी तिने हत्या केल्याचं न्यायालयाने म्हटलंय.
प्रियकर शेरॉन राज बीएससी रेडिओलॉजीच्या अंतिम वर्षात शिकत होता. गीष्मा आणि शेरॉन हे कन्याकुमारीमध्ये भेटले होते. त्यावेळी ते कॉलेमध्ये शिकत होते. तणावाच्या वातावरणात दोघांचे वर्षभराहून अधिक काळ प्रेमसंबंध होते. ग्रिष्माला दुसऱ्या मुलाशी लग्न करायचे होते, म्हणून तिने तिची आई आणि काका यांच्यासोबत मिळून शेरॉनच्या हत्येचा कट रचला. तसेच गिष्माने भविष्यवाणीच्या भीतीने हे कृत्य केलं होतं. एका ज्योतिषने तिला सांगितलं होतं की तिचा नवरा तिच्या आधी मृत पावेल. त्या भविष्यवाणीच्या भीतीने शेरॉन हत्या केली होती.
ग्रीष्माने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तिचा प्रियकर शेरॉन राज याला कन्याकुमारी येथील रामवर्मनचिराई येथील तिच्या घरी बोलावले होते. तिने त्याला आयुर्वेदिक टॉनिक देत त्यातून विष खाऊ घातलं. ११ दिवसानंतर शेरॉन राजचं मल्टी ऑर्गन फेल झाल्यामुळे मृत्यू झाला. शेरॉन राजच्या मृत्यूनंतर पोलिसांनी ग्रीष्माला अटक केली गेली.कोर्टाने शिक्षेच्या सुनावणीदरम्यान शेरॉनच्या पालकांनाही बोलावले आणि केसचे भावनिक गांभीर्य अधोरेखित करत ग्रीष्माच्या काकाला तीन वर्षाची शिक्षा सुनावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.