

BharatPe Saga: शार्क टँक इंडिया या रिअॅलिटी शोमधून चर्चेत आलेले अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) वादांपासून काही दूर होत नाही. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाने अखेर संपला आहे. परिणामी त्यांना स्वतःची कंपनी सोडून बाहेर पडावे लागले. प्रदीर्घ वादानंतर अखेर ग्रोव्हर यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे.
याप्रकरणी पराभवानंतर दिला राजीनामा;
सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (SIAC) येथे ग्रोव्हर यांना त्यांचीच कंपनी BharatPe विरुद्धच्या खटल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतपे त्यांच्याविरुद्ध तपास सुरू करत आहेत. या तपासाला स्थगिती देण्यासाठी ग्रोव्हर यांनी SIAC मध्ये याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. SIAC च्या निर्णयानंतरच ग्रोव्हरने BharatPe चा राजीनामा दिला आहे. त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळाला ईमेलद्वारे राजीनामा दिला.
शिवीगाळची 'ती' क्लिप अन्...
ग्रोव्हर आणि भरतपे यांच्यातील हा वाद एका ऑडिओ क्लिपवरून सुरू झाला. त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ग्रोव्हर कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करत असल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला याबाबत स्पष्टीकरण देत, ग्रोव्हरयांनी ते फेक असल्याचेम्हटले, पण नंतर त्यांनी ते ट्विट काढून टाकले. त्यानंतर, कोटक महिंद्रा बँकेने सांगितले की, ते ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.
ग्रोव्हरयांच्या राजीनाम्याचे कारण 'काही लोक' !
राजीनामा देताना, ग्रोव्हरने लिहिले की, भारतपे सोडताना मला दु:ख झाले आहे, परंतु सर्वात आघडीची फिनटेक कंपन्यांपैकी एक तयार केल्याचा अभिमान आहे. त्यांनी लिहिल, 'मी आज जड अंत:करणाने हा राजीनामा लिहित आहे कारण मला मी स्थापन केलेली कंपनी सोडावी लागत आहे. तथापि, मला अभिमान आहे की, आज ही कंपनी फिनटेकच्या जगात आघाडीवर आहे. काही कारणांमुळे, 2022 च्या सुरुवातीपासून काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. हे लोक केवळ माझ्या प्रतिमेलाच नाही तर कंपनीचेही नुकसान करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.