Serial Kisser : महिलांनो सावधान! 'या' शहरात फिरतोय सीरियल किसर; मुलींना पाहताच होतेय कीस करण्याची वासना

Bihar News : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला हॉस्पिटल बाहेर एका व्यक्तीशी फोनवर बोलत आहे.
Serial Kisser
Serial Kisser Saam TV

kissing Video : गुन्हेगारी विश्वातील आजवर तुम्ही अनेक भयानक घटना पाहिल्या असतील. यात सर्वात जास्त खतरनाक म्हणजे सीरियल किलर्स. सीरियल किलर्स असलेले अनेक माथेफेरू पोलिसांनी पकडले आहेत. मात्र सध्या एका सीरियल किसरची सर्वत्र दहशत पसरली आहे. हा सीरियल किसर महिला दिसली की तिचं चुंबन घेत आहे. या तरुणाचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. त्याने केलेल्या या किळसवाण्या कृत्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Bihar News)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हिडिओ हा बिहारमधील आहे. बिहारच्या जमुई येथील एका हॉस्पिटल बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला हॉस्पिटल बाहेर एका व्यक्तीशी फोनवर बोलत आहे. हॉस्पिटल बाहेर आपल्याला कोणी अचानक कीस करेल असा विचार देखील या महिलेच्या मनात नसेल. पुढे फोनवर बोलताना अचानक हा तरुण येतो. आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून तो सरळ महिलेवर कीसचा हल्ला करतो.

Serial Kisser
Bihar News : दोन तरुणींचा एकमेकींवर जीव जडला; सप्तपदी घेत बांधली लग्नगाठ,पुढे घडलं असं काही की...

महिलेला जोरात पकडून हा तरुण तिला किस करत आहे. महिला फोनवर बोलत असताना अचानक ही घटना घडते. त्यामुळे तिला काय सुरू आहे हे काहीच समजत नाही. ती गोंधळून जाते. महिलेला काही समजण्याआधीच हा तरुण तेथून पळ काढतो. मात्र ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सदर तरुणाचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

Serial Kisser
OYO Rooms: सलाम तुझ्या जिद्दीला! अवघ्या 19 व्या वर्षी सुरू केलेल्या कंपनीचं दिवाळं निघालं; न डगमगता पठ्ठ्यानं OYO उभारलं

बिहारमध्ये नेहमीच गुन्हेगारीच्या अनेक विचित्र घटना घडत असतात. तसेच महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या देखील अनेक भयानक घटना समोर आल्या आहेत. अशात आता या सीरियल किसरमुळे महिलांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेला आता २४ तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र अद्याप हा तरुण फरार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com