SC On Shri Krishna Janmbhoomi: सर्वोच्च न्यायालयाचा मुस्लिम पक्षकारांना झटका, श्रीकृष्ण जन्मभूमीसंदर्भात मोठा निर्णय

SC On Shri Krishna Janmbhoomi: मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मुस्लिम पक्षाला मोठा झटका बसला आहे. वादग्रस्त जमिनीसंदर्भात वकिलांच्या सर्वेक्षणासंदर्भातील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
SC On Shri Krishna Janmbhoomi
SC On Shri Krishna JanmbhoomiSaam Digital
Published On

SC On Shri Krishna Janmbhoomi

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मुस्लिम पक्षाला मोठा झटका बसला आहे. वादग्रस्त जमिनीसंदर्भात वकिलांच्या सर्वेक्षणासंदर्भातील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता पुढील सुनावणी ९ जानेवारीला होणार आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमी वादग्रस्त जमीन प्रकरणात गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय देताना शाही ईदगाह मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. हिंदू पक्षाने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह प्रकरणात वादग्रस्त जागेची वकील आयुक्तांमार्फत सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. न्यायाधीश मयंक कुमार जैन यांच्या खंडपीठाने त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

SC On Shri Krishna Janmbhoomi
Parliament Attack Update : ललित झा राजस्थानला का पळून गेला? कारण आलं समोर, पण पोलिसांसमोरील प्रश्न वाढले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com